सुशांत राजपूत मृत्यू प्रकरण : बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचे उघड , ऑटो रिक्षाने फिरत आहेत बिहार पोलीस….

Advertisements
Advertisements
Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह याच्या  मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी  बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले असून  मुंबई पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.  या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमला कोणतेही वाहन उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठीही काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे चक्क रिक्षातून प्रवास करत बिहार पोलीस अंकिता लोखंडे हिच्या घरी दाखल झाले होते. बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून सहकार्य दिलं जात नसल्याचं समोर येत आहे. दुसरीकडे गृहमंत्र्यांनी मुंबई पोलीस या प्रकरणाच तपास करणार सीबीआयची गरज नसल्याचं वक्तव्य केलं होते तरीही बिहार पोलिसांची हि फरफट चालू आहे.

Advertisements

गेल्या 40 दिवसात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. मात्र सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास केला जात नसल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री आर के सिंह यांनी म्हटले आहे की, मुंबई पोलीस सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करीत आहे. सुशांतच्या कुटुंबीयासोबत आमची संवेदना आहे. ते आमच्या भागातून आहेत. या तपासात कोर्टाकडून मॉनिटरिंग कमिटीसाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून मागणी करायला हवी.

Advertisements
Advertisements

मुंबई पोलीस योग्य मार्गाने तपास करीत नाही…

दरम्यान इतक्या दिवसांनंतरही मुंबई पोलीस योग्य मार्गाने तपास करीत नाही.  पाटण्यात त्यांच्या वडिलांद्वारा एफआयआर दाखल केला आहे, यामध्ये गंभीर आरोप लावले आहेत. 40 दिवसांच्या तपासात निष्पक्ष पद्धतीने तपास झाला नाही यासाठी पाटण्यात हे प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, घटनेचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे. सीबीआयकडे तपास देण्याची काहीही गरज नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने तपास करावा अशी मागणी वेगवेगळ्या स्तरावर केली जात आहे, त्यावरून गृहमंत्री देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे या प्रकरणी सीबीेआयने तपास करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते पार्थ अजित पवार यांनीच केली होती.

सुशांत सिंह हा रिया चक्रवर्तीसोबतच्या नात्यात खूश नव्हता…

दरम्यान बिहार पोलिसांनी अभिनेत्री अंकिता लोखंडे  हिच्याकडून बरी माहिती जमा केली आहे. यावेळी अंकितानेही पुराव्यासह अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहे. अंकिताने बिहार पोलिसांना सांगितले की सुशांत सिंह हा रिया चक्रवर्तीसोबतच्या नात्यात खूश नव्हता. आणि ही गोष्ट स्वत: सुशांतने आपल्या वाढदिवशी अंकिताला सांगितली होती. अंकिताने सुशांतसोबत झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटही पोलिसांना सुपूर्त केला आहे. रियाला सुशांतने अंकितासोबत संपर्कात राहणे आवडत नव्हत. ब्रेकअपनंतरही अंकिता सुशांतच्या संपर्कात होती. मात्र ही गोष्टी रियाला आवडत नव्हती.

सुशांतच्या मृत्यूनंतर या सर्व गोष्टी तिने सुशांतची बहीण नीतू यांना सांगितल्या होती. अंकिताने पोलिसांना सांगितले की सुशांतने त्याच्या डिप्रेशनबाबत तिला कधीच काहीच सांगितलं नव्हतं. शेवटच्या बातचीतमध्ये सुशांत म्हणाला होती की, त्याला बिहारमधील 100 मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची इच्छा आहे. अंकिताने याबाबत सविस्तर माहिती बिहार पोलिसांनी दिली. अंकिताशी पोलिसांनी 50 मिनिटांपर्यंत विचारपूस केली आणि त्यानंतर अंकिताच्या जॅग्वोर गाडीत टीम निघून गेली.

Leave a Reply

आपलं सरकार