Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : लाॅकडाऊनची संधी साधत व्यवस्थापकांनी १०लाख लांबवले…

Spread the love

औरंगाबाद- सुतगिरणी परिसरातील बालाजी पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकांनी लाॅकडाऊनची संधी साधत मालकाचे १० लाख रु.हडपले या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.व दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांनी दिली आहे. मच्छिंद्र कोमटे रा.येवला हल्ली मु.जवाहरकाॅलनी व दुसरा हरिश्र्छंद्र उत्तम भोसले रा.माजलगाव अशी आरोपींची नावे आहेत.व गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
विक्रम सुरेंद्र साळुंके रा.पुणे असे फसवणूक झालेल्या पेट्रोलपंप चालकाचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यात वरील दोन आरोपींनी १६लाख रु.रोजच्या व्यवहारातून हडप केले होते.हा प्रकार साळुंके यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट ने लक्षात आणून दिल्यावर कोमटे आणि भोसले यांनी ६लाख रु.परत दिले व उर्रवरित लवकर परंत करु असे मालकाला सांगितले.पण लाॅकडाऊन संपले तरी आरोपी पैशे परंत करण्याची चिन्हे दिसंत नसल्यामुळे विक्रम साळुंके यांच्या फिर्यादीवरुन वरील दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गायके करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!