Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraUnlockNewsUpdate : जाणून घ्या महाराष्ट्रात काय चालू काय बंद ?

Spread the love

महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम असणार असून  यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आदेशात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यासोबत ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचं कठोरपणे पालन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.केंद्र सरकारकडून कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राच्या नव्या आदेशात जुन्या गाईड लाईन्समध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. पण महत्त्वाचे म्हणजे मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्तराँ आपलं किचन सुरु ठेऊ शकतात. सोबतच आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखंब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी नाही.

दरम्यान दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे. अत्यावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधीही परवानगी होती ते सुरु राहतील तसंच अनावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधी सुरु ठेवण्याची परवानगी आहे ते सुरु राहतील. अत्यावश्यक तसंच अनावश्यक मार्केट, मार्केट परिसर आणि दुकानांना सकाळी ९ चे संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मद्य दुकानांना परवानगी असेल तर सुरु ठेऊ शकतात. अत्यावश्यक तसंच अनावश्यक गोष्टींसाठी ई-कॉमर्सला परवानगी असून सध्या सुरु असलेल्या सर्व इंडस्ट्रियल युनिट्सना काम सुरु ठेवण्याची परवानगी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!