MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ठरले , या आहेत तारखा ….

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवार, ७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. याबाबतची शिफारस आता राज्यपालांकडे करण्यात येणार आहे. यापूर्वी ३ ऑगस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलं होतं. परंतू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने हे अधिवेशन ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisements

याबाबत माहिती देताना संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले, “पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरला सुरु होईल. हे अधिवेशन किती दिवसांचं असेल, कशा पद्धतीने होईल हे ठरवण्यासाठी अधिवेशनाआधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. या बैठकीत अधिवेशन किती दिवसांचं असायला पाहिजे, अधिवेशनात कुठले विषय घेतले पाहिजेत हे सर्व ठरेल. अधिवेशन संस्थगित झाल्यावर पुढील अधिवेशन सहा महिन्यांच्या कालावधीत बोलविण्याची नियमात तरतूद आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १५ मार्चच्या सुमारास करोनामुळे संस्थगित करण्यात आले होते. यामुळे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत अधिवेशन बोलवावे लागेल. यामुळे ऑगस्ट महिनाअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात छोटे अधिवेशन बोलाविण्याची योजना आहे. तसे संकेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी दिले होते.

Advertisements
Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार