Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : अनलॉक-३ केंद्राची अधिसूचना जारी : मोठी बातमी : जाणून घ्या काय चालू काय बंद ? रात्रीची संचारबंदी वगळता ३१ ऑगस्टपर्यंत कुठलाही नाही….

Spread the love

देशातील कोरोना रुग्णांची संख्या  १५ लाखांवर गेली असली तरी  यात दिलासादायक बाब म्हणजे ९ लाखांहून अधिक नागरिक करोनामुक्त झालेत. मात्र, देशात दिवसेंदिवस करोनाचे हजारो नवीन रुग्ण आढळून येत आहेत. करोनाने देशात ३२ हजारांहून नागरिकांचा मृत्यू झाला आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध प्रदेश आणि दिल्लीत आढळून येत आहेत. यामुळे केंद्र सरकारने सार्वजनिक वाहतूक यंत्रणा, चित्रपटगृहांसह शाळा आणि कॉलेजेस ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवली आहेत. धार्मिक स्थळंही बंद राहणार आहेत. फक्त रात्री असलेली संचारबंदी आता उठवण्यात आली आहे.


अनलॉकसाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना…

जिम आणि योगा क्लासेस ५ ऑगस्टपासून सुरू करता येणार, रात्रीची संचारबंदीही हटवली. पण शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत.

अनलॉक ३ मध्येही चित्रपटगृह, मेट्रो, स्विमिंग पूल बंद राहणार आहेत. तर कंटेन्मेंट झोन्समध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता तिथे कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही.

धार्मिक, समाजिक, राजकीय आणि सांस्कृति व मनोरंज कार्यक्रम किंवा सभांच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने केंद्र सरकारने त्यावरील बंदी कायम ठेवली आहे.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्या दिन साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण त्या दिवशी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांनुसार म्हणजे मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. कंटेन्मेंट झोमधील लॉकडाउन कायम राहिली. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार कंटेन्मेंट झोन ठरवण्याचा निर्णय जिल्हा पातळीवर घेता येणार आहे.

६५ किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, गंभीर आजार असलेले रुग्ण, गर्भवती महिला आणि १० वर्षाखालील मुलांना आधी प्रमाणेच घरी राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. अवश्यक असल्याच घराबाहेर पडण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.

सर्वाजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असेल. गर्दी होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी असेल. लग्न समारंभासाठी ५० हून अधिक पाहुण्यांना परवानगी नाही. अंत्यविधीलाही २० पेक्षा अधिक नागरिकांना परवानगी नाही. तसंच सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा आणि तंबाखू आणि दारू पिण्यास बंदी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!