Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate 13566 : दिवसभरात 197 नव्या रुग्णांची भर, 6 मृत्यू , जिल्ह्यात 9680 कोरोनामुक्त, 3422 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 342 जणांना (मनपा 188, ग्रामीण 154) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 9680 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 197 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13566 झाली आहे. आजपर्यंत एकूण 464 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3422 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 126 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 34, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (25)
मेहेर नगर (2), जुना बाजार परिसर (1), बारुदगर नाला (1), देवळाई चौक, दत्त मंदिरा जवळ (1), कोहिनूर कॉलनी (2), टाऊन सेंटर (1) , शहानूरवाडी (1), कुंभारवाडा (1), जागृत हनुमान मंदिर परिसर (1), पैठण रोड (1), बालाजी नगर (1), एन आठ सिडको (2), बजरंग चौक परिसर (1), एन सहा सिडको (1), विशाल नगर (1), लुनार सो., सिडको (1), बीड बायपास (2), जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वेलकम झेरॉक्स जवळ (1), मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर (1), पेडगाव (1), एसटी कॉलनी (1)
ग्रामीण (12)
जामा मस्जिद जवळ, वाळूज (1), बजाज नगर (3), नायगाव (1), गांधी नगर, रांजणगाव (2), भराडी (1),झाकेर हुसेन नगर, सिल्लोड (1), सिल्लोड (1), रांजणगाव (1), वडगाव कोल्हाटी (1)
सिटी एंट्री पॉइंट (34)
मिटमिटा (3) , बजाज नगर (4), छावणी (2), पुष्पनगरी (2), बीड बायपास (3), गजानन महाराज मंदिर जवळ (2), हनुमान नगर गल्ली क्र. दोन (1), ब्रिजवाडी (1), गरम पाणी (2), वाळूज (1), बाळापूर (5), गारखेडा (1), शेंद्रा एमआयडीसी (1), कुंभेफळ (1), नारेगाव (1), मोती कारंजा, शाहगंज (1), चित्तेगाव (1), अयप्पा मंदिर, बीड बायपास रोड (2)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत शहरातील हडको, टीव्ही सेंटरमधील 71 वर्षीय पुरूष, छावणी, गवळीपुऱ्यातील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात 3640 रुग्णांवर उपचार सुरू, 71 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 71 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13440 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 9338 बरे झाले, 462 जणांचा मृत्यू झाला. तर 3640 जणांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या 38 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांचा जिल्ह्यातील भागांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण (41)
पाचोड,पैठण (2), नूतन कॉलनी, गंगापूर (1), औरंगाबाद (9), फुलंब्री (1), सिल्लोड (2), वैजापूर (15), पैठण (7), सोयगाव (4)
मनपा (30)
बैजिलाल नगर (1), सिडको परिसर (1), मुकुंदवाडी (1), जवाहर कॉलनी (1) पंचशील नगर (2), रोशन सो., गारखेडा (1), उल्कानगरी (4), एन सहा सिडको (6), संघर्ष नगर, मुकुंदवाडी (3), सिद्धार्थ नगर (5), गवळीपुरा (1), राम नगर (1), एन सात, अयोध्या नगर (1), गारखेडा परिसर (2)

चार कोरोनबाधितांचा मृत्यू

खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समता नगर, शिक्षक कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील 59 वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील 70 वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील 46 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!