Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaPuneUpdate : पुण्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ …

Spread the love

मुंबई , ठाण्यापेक्षाही पुण्यातील कोरोनाच्या संसर्गाने गती घेतली आहे. पुण्यात  दुसऱ्यांदा लॉकडाऊन करूनही पुण्यातील संसर्ग आटोक्यात येत नसल्यामुळं प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या साथीचा उद्रेक झाल्यापासून मुंबई, ठाणे व पुणे हे महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ठाण्याचा क्रमांक लागतो व पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत आतापर्यंत १ लाख १० हजार १८२ लोकांना करोनाची लागण झाली आहे. ठाणे जिल्ह्यात हा ८७,७९० इतका आहे. तर, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७८,१३० लोकांना कोरोनानं गाठलं आहे.

एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असला तरी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पुण्यानं मुंबई व ठाण्यालाही मागे टाकलं आहे. पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ४८,६७२ रुग्ण उपचार घेत आहेत. ठाण्यात हा आकडा ३४,४७१ आहे. तर, मुंबईत केवळ २१,८१२ रुग्ण उपचार घेत आहेत. याबाबतीत पुणे जिल्हा राज्यात आता पहिल्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्ह्यात ५६९५, नाशिक जिल्ह्यात ५१५२, रायगडमध्ये ४९२७ तर औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ४,९०६ रुग्ण उपचार घेत आहेत.

पुणे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे  प्रमाण अवघे ३५ टक्के आहे. मुंबईत हेच प्रमाण ७४ टक्के तर ठाण्यात एकूण रुग्णांच्या प्रमाणात ५८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण करोनामुक्त होण्याचे सर्वाधिक प्रमाण गोंदियामध्ये आहे. तिथे ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत पुणे जिल्ह्याने मुंबई व ठाण्याला मागे टाकले असले तरी येथील करोना मृत्यूची टक्केवारी तुलनेनं कमी आहे. पुण्यातील मृत्यूदर २.४ टक्के आहे. मुंबई व ठाण्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे १८३८ मृत्यू झाले आहेत. ठाण्यात २३८६ रुग्णांचा बळी गेला आहे तर मुंबईतील हा आकडा सहा हजारांच्याही वर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!