CoronaVirusUpdate : अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना कोरोनाची लागण

Advertisements
Advertisements
Spread the love

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना कोरोनाची लागण झाली आहे. रॉबर्ट ओब्रीन यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. दरम्यान जगभरात 1 कोटी 59 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील तब्बल 42 हजार 50 रुग्ण हे अमेरिकेतील आहे. अमेरिकेत कोरोनानं थैमान घातले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत 1 लाख 48 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात अमेरिकेत आता आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. अमेरिकेतील 11 राज्यांतील 640हून अधिक लोकांना सायक्सोस्पोरा (cyclospora) नावाचा आजार झाला आहे. सायक्सोस्पोरा हा आजार पॅकेटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलडमुळे होतो. पॅकेट सॅलडमध्ये आइसबर्ग लेटस, गोभी आणि गाजर असतात. हे सॅलड खाल्यानंतर तब्बल 641 जणांना या विचित्र आजाराची लागण झाली आहे. यातील 37 जणांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार