Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : कोण आहेत साकेत गोखले ? आणि अयोध्येच्या कार्यक्रमा विरोधात त्यांची याचीका काय आहे ?

Spread the love

देशात सर्वत्र कोरोनाचा कहर चालू  असताना आणि देशातील सर्वच धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर साथरोग कायद्याने पूर्णतः बंदी असताना , पंतप्रधानच्या  उपस्थितीत अयोद्ध्येत कार्यक्रम घेण्यास परवानगी कशी दिली ? अशी याचिका पत्रकार साकेत गोखले याने केल्यामुळे आयोजक , संघ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे . हि माहिती मिळताच संघाच्या कार्यकर्त्यांनी साकेत गोखले यांच्या घरी जाऊन  घोषणाबाजी केली. त्यांच्या आईला धमकी दिली असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिलेत. यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांना सुरक्षा  पुरवली असून साकेत यांनी याबद्दल अनिल देशमुख यांचे आभार मानले आहेत.

हे वृत्त प्रसिद्ध होताच साकेत गोखले कोण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. ज्यांना हा प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी , साकेत गोखले हे ठाणे येथे राहणारे पत्रकार असून  त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी म्हणून काम  केले आहे. ते आरटीआय कार्यकर्ते देखील आहे. त्यांनी या माध्यमातून अनेक प्रकरणं बाहेर काढली आहेत . काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. राहुल गांधीच्या समर्थानार्थ तसेच भाजप सरकारच्या धोरणांविरोधात ते सातत्याने ट्विटरवर  लिहित असतात.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचं भूमीपूजन ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र या प्रस्तावित भूमीपूजनाला विरोध करण्याची मागणी करत साकेत गोखले यांनी एक याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली आहे. यात राममंदिराचं भूमीपूजन म्हणजे अनलॉक 2 च्या गाईडलाईन्सचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. साकेत गोखले यांनी हायकोर्टात चीफ जस्टिस यांना लेटर पीआयएलच्या माध्यमातून ही याचिका केली आहे. गोखले यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे की, भूमीपूजन कोविड-19 च्या अनलॉक-2 गाईडलाईन्सचं उल्लंघन आहे. याचिकेत म्हटलं आहे की, अयोध्येमध्ये भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी 300 लोकं एकत्रित होतील, जे कोविड 19 च्या नियमांच्या विरोधी आहे. यात असं देखील म्हटलं आहे की, या कार्यक्रमामुळं कोरोनाचं संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. केंद्राच्या गाईडलाईन्समधून यूपी सरकारला सूट मिळू शकत नाही. जर ही लेटर पिटीशन मंजूर झाली तर चीफ जस्टिस यांनी नियुक्त केलेल्या खंडपीठात या प्रकरणी सुनावणी होईल. या याचिकेत राममंदिर ट्रस्टसोबत केंद्र सरकारला देखील पक्षकार बनवलं आहे. आपल्या याचिकेत गोखले यांनी बकरी ईदला सामूहिक नमाज करण्याची परवानगी दिली नव्हती, याचा देखील उल्लेख केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!