Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaEffect : अवास्तव बिल वसुलीच्या कारणावरून होरिझन प्राईम रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची कारवाई

Spread the love

कोरोनाबाधित रुग्णांकडून अवास्तव बील वसूल करणाऱ्या रुग्णालयावर  राज्य शासनाने कडक कारवाईस सुरुवात केली  असून घोडबंदर रोडवरील होरिझन प्राईम रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने  कारवाई करता एक महिन्यांसाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द केली आहे. ठाणे महानगरपालिकेने आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी काही खासगी रुग्णालयांना कोविड हॉस्पिटलची मान्यता दिली आहे. परंतु या रुग्णालयांकडून रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्यात आली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने लेखा परिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या भरारी पथकाने ठाण्याच्या विविध रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांची ऑडिट सुरू केले आहे. त्यात ठाण्याच्या होराइजन प्राईम हॉस्पिटलमधून पालिका प्रशासनाने दिलेल्या दर आकारणी पेक्षा जास्त बिल आकारलेली 56 बिले आढळून आली.

संबंधित  रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात खुलासा न आल्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेने या रुग्णालयाचा कोविड केअर रुग्णालयाचा दर्जा रद्द करून एका महिन्यांसाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र मुरुडकर यांनी दिली आहे. दरम्यान होरायझन प्राईम रुग्णालय प्रशासनाने पालिकेने केलेल्या या कारवाईच्या विरोधात पालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे. पालिकेने आमचे  म्हणणे  ऐकून न घेता एकतर्फी कार्यवाही केल्याचा आरोप आहे. होरायजण प्राईम हॉस्पिटल मेडिकल डायरेकटर ऋषिकेश वैद्य यांनी केली आहे. रुग्णांकडून अवाजवी बिल वसूल करणाऱ्या अशा रुग्णालयांवर चाप लावण्यासाठी आता पालिका प्रशासनाने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अशी जर अवाजवी बिल आकारले जातील तर नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!