Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadUpdate : वयाने सर्वात ज्येष्ठ असूनही आपण का फिरतोय ? याचे खा. शरद पवार यांनी स्वतःच दिले हे उत्तर ….

Spread the love

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाने घराच्या बाहेर पडू नये किंवा शासकीय नोकरीतील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना फिल्डवर पाठवू नये असे कोरोना अनलॉक कायद्याचा नियम असतानाही स्वतःच्या आरोग्यापेक्षा जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  शरद पवार हे स्वतः राज्यभर दौरा करत आहेत  परवा दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर पवार यांनी काल नाशिकमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रात्री औरंगाबाद शहरात मुक्काम करून आज औरंगाबाद शहरातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन  कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.  राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणे महत्त्वाचं आहं. यासाठी मी दौरे करतोय, मला करमत नाही, मला एका जागेवर बसवत नाही. मी सतत लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे. मला लोकांशी बोलत राहण्याची सवय आहे. यामुळे मी फिरत असतो. जिथे संकट आलं तिथे मी जातो. चौकशी करणं, मदत करणं, या भावनेतून मी फिरतोय, असं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान औरंगाबादमध्येही कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. आवश्यक ती उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बेड्सची संख्या वाढवण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले. शहर आणि ग्रामीण या दोन्हीही ठिकाणी लोकांची सहकार्याची भूमिका आहे. आपण लवकरच संकटावर मात करु, असा विश्वास देखील पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात एकही दौरा केला ही. ते एका ठिकाणी बसूनच राज्यातील कामकाज पाहत आहेत. यावर विरोधकांकडून कडाडून टीका होत आहे. मी महाराष्ट्रभर फिरतोय, मुख्यमंत्री एकाच ठिकाणी बसून आहेत, या मागील कारण सांगून शरद पवार यांनी विरोधकांची बोलती बंद केली.

लातूरात भूकंप आला होता तेव्हा पवारांनी मुख्यमंत्री कार्यालय लातूरात हलवलं होतं. परंतु मुख्यमंत्री कुठेही जात नाही, असा सवाल विरोधक करत आहेत. यावर शरद पवार यांनी सांगितलं की, लातूरचा भूकंप होता, तर तो एका जिल्ह्याचा भाग होता. आताचं संकट हे संपूर्ण राज्यातील आहे. यामुळे मुख्यमंत्री एकाच भागात जाऊन बसले तर, निर्णय प्रक्रियेत अडचणी निर्माण होतील. यामुळे कॅप्टनने मुख्य ठिकाणी बसून सर्वांवर लक्ष ठेवावे, जी कमतरता असेल ती सांगावी, असा आमचा आग्रह आहे. आता पालकमंत्री इथून गेले तर ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या संबंधीत गोष्टींशी चर्चा करतील. ही कमतरता आहे ती पूर्ण करा, मी देखील मुख्यमंत्र्यांना भेटून कमतरतांविषयी सांगेल. यामुळे त्यांनी एका ठिकाणी बसून लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं शरद पवार म्हणाले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!