Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneCoronaUpdate : पुण्यातील माजी नगरसेवकाचा उपचाराच्या तिसऱ्याच दिवशी मृत्यू , घरातील १४ लोकांवर चालू आहेत उपचार !!

Spread the love

पुणे शहरातील  शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर  यांचा आज करोनामुळे  मृत्यू झाला.  मारटकर हे 2002 ते 2012 या काळात ते नगरसेवक होते. विजय मारटकर यांच्या घरातील 14 जण कोरोना बाधीत झाले होते. 14 जुलैला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. लक्षणे नसल्याने त्यांना प्रथम बालेवाडी येथील कोविड सेन्टर मध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना त्रास जाणवू लागला मग दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. नंतर त्यांची प्रकृती बिघडतच गेली आणि आज त्यांचा संघर्ष संपला. ते 67 वर्षांचे होते. त्यांना ब्लड प्रेशर आणि डायबेटिजचा त्रास होता. त्यांची दोन  वेळा Angioplastyही करण्यात आली होती.

रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारटकर यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेली 3 दिवसांपासून  उपचार सुरु होते. त्याच दरम्यान त्यांच्या आजूबाजूचे 2 रुग्ण दगावले. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी मंगेशकर हॉस्पिटलमधून दुसरीकडे नेण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांना KEMला शिफ्ट  करण्यात आलं होतं. तिथेच आज त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान, पुणे विभागातील 40 हजार 99 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 65 हजार 989 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 23 हजार 931 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 794 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.97 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 54 हजार 13 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 34 हजार 371 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 244 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 12 हजार 695 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 803 व पुणे कॅन्टोंन्मेंट 198 , खडकी विभागातील 47 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 445 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 56 रुग्णांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!