Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात १३३ पोलिसांना कोरोना , ८७ पोलिसांचा मृत्यू

Spread the love

कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण यावे म्हणून लोकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रणसाठी गेल्या चार महिन्यांपासून पोलिस दिवस-रात्र आपलं कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यावर ड्युटी करत आहेत. त्यामुळे पोलिसांचा अनेकांशी संपर्क येत आहे. परिणामी कोरोनाबाधित पोलिसांचा संख्याही वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १३३ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात १९ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर २ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १८४ कोरोनाबाधित पोलिस अधिकारी आणि १३०५ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ८७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात ७ पोलिस अधिकारी तर ८०  पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान कोरोना संकटाच्या काळात पोलिस गेल्या कित्येक दिवसांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. पोलिस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्धांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांमध्ये मुंबईतील ४७ पोलीस व ३ अधिकारी असे एकूण ५०, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,  नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५,  ठाणे ग्रामीण २ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर २, रायगड २, जालना एसआरपीएफ १ अधिकारी, जालना ग्रामीण १, अमरावती शहर १,  उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी, औरंगाबाद शहर १, नवी मुंबई १ आणि इतर दोन अशा ८७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांची कामगिरी

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५४६ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २८७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. १७ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप-  २०६ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – २३० गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १८ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६० गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २८७ आरोपींना अटक.

■  ११८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे या विभागातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या १७ वर.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात एका व्यक्ती विरुद्ध बदनामीकारक राजकीय आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवर पोस्ट केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ८९४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ०९ हजार ५४० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १७ जुलै या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१४ (८७९ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार ४८६

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४४

जप्त केलेली वाहने – १ लाख ०५ हजार १७६.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!