Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaEffect : क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधिताची आत्महत्या

Spread the love

मुंबई नंतर ठाणे, नवी मुंबई परिसरात कोरोनाचा कहर चालूच असून भिवंडीतील रांजणोली येथील आमंत्रण क्वारंटाइन सेंटरच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एका व्यक्तीने  उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे. प्रशांत आंबेकर (वय-40)  असे या मृत व्यक्तीचे  नाव असून त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने  प्रशांत आंबेकर यांनी आत्महत्येसारखं टोकाचे  पाऊल उचलल्याचे  बोलले  जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  आमंत्रण क्वारंटाइन सेंटरमध्ये भिवंडीसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेंतर्गत येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना ठेवण्यात आले  आहे. मृत प्रशांत आंबेकर हे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रहिवासी होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आंबेकर यांच्यात कोरोनाची लक्षण दिसत होती. त्यामुळे त्यांनी आमंत्रण क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होत. मात्र, प्रशांत यांनी 5 व्या मजल्यावरील खिडकीतून थेट खाली उडी घेतली. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशांत आंबेकर यांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे,  लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. भिंवडी शहरात देखील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडीत 31 जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!