Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AyoddhyaNewsUpdate : राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी, पंतप्रधानांना दिल्या दोन तारखा

Spread the love

अयोध्येत राम मंदिराच्या  भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. राम मंदिर निर्माण तीर्थ ट्रस्ट’च्या आज झालेल्या मोठ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 3 किंवा 5 ऑगस्ट अशा दोन तारखा मंदिर समितीने पंतप्रधानांना सुचविल्या आहेत. आता वेळेचं गणित पाहता कुठली तारीख निवडायची याचा पंतप्रधान निर्णय घेणार आहेत. पंतप्रधान हे निमंत्रण स्विकारण्याची पूर्ण शक्यता आहे. मोदी अयोध्येत आलेत तर पंतप्रधान झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच अयोध्याभेट ठरणार आहे.

‘राम मंदिर निर्माण तीर्थ ट्रस्ट’ची  आज बैठक झाली त्यात सर्व सदस्य सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भातला आढावा घ्यायलाही सुरुवात केली आहे. प्रस्तावित राम मंदिर हे 161 फुटांचं भव्य असून त्याला 5 डोम असणार आहेत. राम मंदिर परिसर आणि सर्व अयोध्येच्या विकासाचा नकाशा तयार केला जात आहे. श्रावण महिना हा पवित्र समजला जातो. याच महिन्यात भूमिपूजन व्हावं असा ट्रस्टचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांच्या हस्तेच भूमिपूजन व्हावं अशी ट्रस्टच्या सगळ्यांचीच इच्छा होती.

देशातल्या सर्व नागरिकांचा या बांधकामात सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी या आधीच दिली होती. मंदिरासाठी पैसे कमी पडले नाहीत आणि पडणारही नाहीत असंही राय यांनी सांगितलं होतं. कोरोना आणि लॉडाऊनमुळे राम मंदिराच्या बांधकामाच्या तयारीचा वेग थोडा मंदावला होता. आता त्याला वेग देण्याचा प्रयत्न होत आहे. ट्रस्ट आणि सरकारला पुढच्या दोन ते तीन वर्षांमध्ये हे बांधकाम पूर्ण करायचं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!