Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीदरबारी जाण्याचे कारण काय ?

Spread the love

माझी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही दिल्लीत भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अमित शहा यांच्या कानावर घालणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामागे एक तर महाराष्ट्राचे राजकारण किंवा फडणवीस यांची केंद्रीय राजकारणात एंट्री हि दोन कारणे असल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, मदन भोसले आणि आमदार जयकुमार गोरे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील मात्र दिल्लीत गेलेले नाहीत. तब्येत ठीक नसल्याने लोणीतच असल्याचं सूत्रांनी सांगितलं. साखर कारखान्यांचे प्रश्न आणि राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत गेल्याचं सांगण्यात येतं. दिल्लीवारीत ते भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान हातात आलेली सत्ता महाराष्ट्रातून गेल्याचे शल्य भाजप अजूनही विसरायला तयार नाही. राजस्थान आणि मध्यप्रदेश बरोबर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातही ऑपरेशन लोट्स सुरू होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राजस्थाननंतर महाराष्ट्रात सत्तांतर होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरता सुरू असतानाच फडणवीस दिल्लीत गेल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांच्या दिल्ली भेटीत वरिष्ठांशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान  या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेते हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस यांचे नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदन करणारे ट्विट करून डिलीट केले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्यातील कोरोनाग्रस्त भागांचाही दौरा केला होता. त्याबद्दलची चर्चाही या दौऱ्यादरम्यान केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकतंच पक्षाचे नेते आशिष शेलार यांनीही दोन दिवसीय दिल्ली दौरा केला होता. त्यात त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचीही भेट घेतली होती. तसंच इतरही नेत्यांची भेट घेतली होती. याशिवाय फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार आहे, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!