Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaEffect : औरंगाबादकरांसाठी मोठी बातमी : कोरोना टेस्टशिवाय आता व्यापार नाही….

Spread the love

औरंगाबाद महानगरपालिकेचे  प्रशासक तथा आयुक्त  आस्तिक कुमार पांडेय यांनी आज शुक्रवारी  व्यापारी महासंघ, भाजी विक्रेते संघटना, दूध विक्रेते संघटना, किराणा दुकान मालक संघटना, चिकन-मटन विक्रेते संघटना, दूध आणि अंडी विक्रेता संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसमवेत १८ जुलैनंतर उघडणाऱ्या लॉकडाऊन बाबत चर्चा करताना शहरात व्यापार करणाऱ्या कुठल्याही व्यापाऱ्याला कोरोना टेस्ट प्रमाणपत्र असल्याशिवाय व्यापार करता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. चर्चेदरम्यान त्यांनी खालील बाबींची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.


काय आहेत सूचना ?

1)18 जुलैला दुपारी दोन वाजेपासून औरंगाबाद महानगरपालिका तर्फे सर्व किराणा दुकान चालक, भाजीपाला विक्रेते, दूध,फळ विक्रेते, चिकन-मटन, अंडी विक्रेत्यांची कोरोना अँटीजन चाचण्या करण्यात येतील.
2) सर्व संघटनांनी नेमून दिलेल्या स्पॉटवर शिबीर लावून चाचण्या करण्यात येईल.
3) जे विक्रेते अँटीजन चाचणीत कोरोना निगेटिव्ह येतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. रविवारनंतर फक्त निगेटिव्ह प्रमाणपत्र धारकांना साहित्य विक्रीची मुभा राहील.
4) या आदेशाची यशस्वी आणि काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी महानगरपालिके तर्फे 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी वर नमूद प्रत्येक विक्रेत्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याची खात्री करून प्रमाणपत्र देतील. ज्या विक्रेत्याकडे प्रमाणपत्र नसेल त्यांना दंड आकारणी करण्यात येईल. तसेच त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल.
5) सदरील आदेश पुढच्या सात दिवसांपर्यंत अंमलात राहील.
6) जाधव मंडी येथे तपासणी करण्यासाठी दोन पथक नेमण्यात येईल.
7) दुसऱ्या टप्प्यात अन्य आस्थापना जिथे लोकांची गर्दी कमी असते उदाहरणार्थ मेडिकल, गॅरेज यासह इतर आस्थापना यांची कोविड चाचण्या करण्यात येईल.

दरम्यान, ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. स्वतःसह आपल्या परिवाराच्या आरोग्याची जबाबदारी सर्वांच्या हातात आहे. नागरिकांनी सतर्क राहून कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगणाऱ्या विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे, औरंगाबाद महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!