Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaEffectMaharashtra : वरवरा राव यांना कोरोना, जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू

Spread the love

बहुचर्चित एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असणारे कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. माओवादी चळवळीशी संबंधित असण्याचा आरोप राव यांच्यावर आहे. मुंबईच्या कारागृहात असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भीमा कोरेगावला डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या दंगलींना एल्गार परिषदेमुळे प्रोत्साहन मिळाले, असा  त्यांच्यावर आरोप आहे. तेलुगू कवी आणि कार्यकर्ते असलेल्या राव यांना पोलिसांनी अटक केली होती. कारागृहात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आता मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये हलवण्याची शक्यता आहे. वरवरा राव 81 वर्षांचे आहेत. सोमवारी त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयता तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. तब्येत खालावलेली असल्याने जामीन मिळावा, अशी त्यांची विनंती होती. पण जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!