MaharashtraEducationUpdate : पालक आणि विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या , २४ जुलै पासून सुरु होत आहे ११ वीसाठी ऑनलाईन प्रवेश

Advertisements
Advertisements
Spread the love

कोरोनाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात अंतिम वर्गाच्या परीक्षा घेण्यास सरकारने नकार दिला आहे. तर दुसरीकडे आता 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 26 जुलैपासून सुरू होणार आहे. अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रकियेच्या कामकाज सुरू करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकाने दिले आहे.

Advertisements

मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या भागात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ऑनलाइन प्रवेशासाठी https://mumbai.11thadmission.org.in हे संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आले आहे. 2020-21 शैक्षणिक वर्षासाठीच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत विद्यार्थी आणि पालकांसाठी सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व विद्यार्थी, शाळांना ही प्रक्रिया ऑनलाईनच करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

प्रवेशाचे वेळापत्रक असे आहे

– अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी या संकेतस्थळावर 24 जुलैपासून प्रयत्न करू शकता.

– ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भरणे, माहिती गोळा करणे, प्रवेश अर्ज व्हेरीफाईड झाला याची खात्री करणे, यासाठी 26 जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे.

–  विद्यार्थ्यांचा अर्जाची माहिती तपासून पाहण्याची शाळांना 27 जुलैपासून मुदत दिली आहे.

Online classesसाठी केंद्राने जाहीर केले नवे नियम

दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी Online classes सुरू केले आहेत. त्यामुळे मुलं तासंतास आता मोबाईलसमोर राहात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पालक संघटना आणि तज्ज्ञांनी नियमावली जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे Online classesच्या नावावर काही शाळांनी सुरू केलेल्या मनमानीला चाप लागणार आहे.

Pre Primary – पालक आणि मुलांसाठी ठरवून दिलेल्या दिवशी फक्त 30 मिनिटे

Classes 1 to 12 – सगळ्यांसाठी NCERTने अभ्यासक्रम आखून दिला आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम घेतला जावा.

Classes 1 to 8 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे दोन सेशन्स. त्यापेक्षा जास्त नको

Classes 9 to 12 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे चार सेशन्स.

या व्यतिरिक्त काही गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. सतत स्क्रिन समोर राहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सतत घरी बसून राहिल्यामुळे त्यांच्या खेळण्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे व्यायाम होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या जडण घडणीवर होऊ शकतो.

आपलं सरकार