Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : जाणून घ्या पुण्यात काय चाललंय ?

Spread the love

अनलॉकच्या काळात राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सुधारणेच्या दारात वाढ होत असल्याचे केंद्र आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे एका निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. बुधवारी (15 जुलै) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले आहे. व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (वय 61) असं त्या माजी शास्त्रज्ञांचं नाव आहे. पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियातून ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. न्यूज १८ लोकमत या वृत्त वाहिनीने हे वृत्त दिले आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 196 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण   3.15  टक्के आहे.

शासनाच्या माहितीनुदार पुणे जिल्ह्यातील 42 हजार 846 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 26 हजार 623 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 424 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 11 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 724, सातारा जिल्ह्यात 106, सोलापूर जिल्ह्यात 69, सांगली जिल्ह्यात 27 तर कोल्हापूर जिल्ह्यात 85 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!