Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationUpdate : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, महाराष्ट्र ९८.५ टक्के , पुणे देशात चौथ्या स्थानावर

Spread the love

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात थोडी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. विद्यार्थी www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला आहे.

यंदा १८ लाख ८५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ७३ हजार १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थी पास झाले आहेत. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी निकाल जाहीर होईल अशी घोषणा केली होती. विद्यार्थी वेबसाईट्स याशिवाय एसएमएस, डिजीलॉकर आणि उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकणार आहेत.

टॉप ५ विभागांमध्ये पुणे चौथ्या स्थानी

सीबीएसई दहावीच्या निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल ९९.२८ टक्के लागला आहे. त्या पाठोपाठ चेन्नई दुसऱ्या (९८.९५ टक्के निकाल), बंगळुरू तिसऱ्या (९८.२३ टक्के निकाल) तर पुणे चौथ्या (९८.०५ टक्के निकाल) स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर अजमेर (९६.९३ टक्के निकाल) विभाग आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!