Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी घाबरू नका , जाणून घ्या रुग्ण बरे होण्याचा दर …

Spread the love

देशभरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 24 तासांत 29 हजार 429 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं 25 ते 29 हजार नवीन रुग्णांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या कोरोनाचे सध्या 3 लाख 19 हजार 840 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 92 हजार 31 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला. त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोनामुळे 24 तासांत 582 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची आकडेवारी 24 हजार 309 वर पोहोचली आहे.

दरम्यान एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरीही कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण 63 टक्के असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत देशातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची टक्केवारी केवळ 3.95 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देऊन डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्यानं काहीसा दिलासाही आहे. याआधी 13 जुलै रोजी सर्वाधिक 28 हजार 178 नवीन रुग्णांची नोंद कऱण्यात आली होती. दरम्यान, 20 हजार 968 रूग्ण बरे झाले हेदेखील एक दिलासा देणारी बाब आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!