Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaEffectUpdate : रक्तात मधुमेहाचे प्रमाण अधिक असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका संशोधनानुसार, रक्तात मधुमेहाचे प्रमाण अधिक असणाऱ्या रुग्णांचा कोरोना आजारामुळे मृत्यू होण्याचा अधिक धोका असल्याचे समोर आल्याने अशा रुग्णांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याशिवाय या रुग्णांमध्ये इतर आजाराचाही धोका बळावतो. ‘डायबिटोलॉजिया’ या नियताकालिकेत प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, संशोधनकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फास्टींग ब्लड ग्लुकोज (एफबीजी) स्तर आणि आधीपासून मधुमेहाचे निदान न करता कोविड-१९ बाधित रुग्णांच्या २८ दिवसांच्या मृत्यू दराच्या संबंधांचा अभ्यास केला.

दरम्यान दोन रुग्णालयातील रुग्णांच्या अभ्यासानंतर या संशोधनात करोनाबाधितांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्याची शिफारस करण्यात आली आहे. रुग्णांना मधुमेहाचा आजार नसतानाही ही चाचणी करण्यात यावी असे संशोधनात म्हटले आहे. करोनाबाधित रुग्णांमध्ये ग्लुकोज मेटाबोलिक संबंधी आजार अधिक असण्याची शक्यता आहे. या संशोधनात ६०५ रुग्णांचा समावेश करण्यात आला. यातील ११४ रुग्णांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. यामध्ये ३२२ पुरुष रुग्णांचा समावेश होता. यातील बहुतांशी रुग्णांना उच्च रक्त मधुमेहाचा आजार असल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!