MumbaiNewsUpdate : ” राजगृह “तोडफोड प्रकरण : मुख्य आरोपी अद्याप मोकाट

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यास पोलिसांना यश मिळाले नाही. विशेष म्हणजे, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजनुसार हा आरोपी दादर ते ठाणे चालत गेल्याची माहिती माटुंगा पोलिसांना मिळाली आहे. या माहितीनुसार राजगृहावर तोडफोड करणारा हा हल्लेखोर ठाण्यातील तीन हात नाका येथील चौकातून तो चालत जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा हल्लेखोर पुढे भिवंडीच्या दिशेने गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

Advertisements

सीसीटीव्हीमध्ये राजगृह हल्ला प्रकरणातील आरोपी तीन हात नाका चौकातून चालत जाताना स्पष्ट दिसत आहे. पोलिसांना या आरोपीचा मागोवा मिळाला असून लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील अशा विश्वास माटुंगा पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान,  09 जुलै  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इथल्या निवास स्थानी 7 जुलैला हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परेल टीटी भागात हा आरोपी राहणारा असून याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. अधिक तपास केला असता सीसीटीव्ही आणि साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर या  आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालं असलं तरी हे कृत्य त्यांनी का आणि कोणाच्या सांगण्यावरून केले ? याचा पोलीस  शोध घेत आहेत.

Advertisements
Advertisements

दरम्यान  पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव उमेश जाधव आहे. उमेश जाधव हा प्रेस भागात राहणारा 35 वर्षांचा तरुण आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने हे कृत्य का केलं याबाबत पोलिसांनी अजून खुलासा केला नाही तर मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही.

आपलं सरकार