Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून वगळलेले लोकशाहीविषयक धडे पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

Spread the love

मुंबई : धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून, लोकशाही गणराज्याचे मूलाधार असलेले भारतीय संविधान खिळखिळे करण्याचा डाव उधळून लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ . गणेश देवी यांनी संविधान कार्यकर्त्यांना केले. महाराष्ट्रातील प्रागतिक साहित्यिक, कलावंत आणि विविध व्यावसायिकांनी गेल्या महिन्याभरापासून ‘अभ्यासक्रमात संविधान’ ही मोहीम सोशल माध्यमांद्वारे चालवली आहे. काल रविवारी संध्याकाळी घेतलेल्या ऑनलाईन सहविचार सभेत डॉ. गणेश देवी यांनी हे आवाहन केले.

अॅडव्होकेट-लेखक राजेंद्र पै, सुभाष वारे, हेरंब कुलकर्णी, जयराज साळगावकर, सुषमा देशपांडे, अंजली कुलकर्णी, जालिंदर सरोदे, अल्लाउद्दीन शेख आदी संविधान प्रेमींनी या सभेत भाग घेतला.

सीबीएसई बोर्डाने यावर्षी भारतीय संविधानातील महत्त्वाचे घटक, कोविडचे कारण देऊन अभ्यासक्रमातून वगळल्याबद्दल या सभेत तीव्र असमाधान व्यक्त करण्यात आले. या घटनाविरोधी निर्णयाचा पुनर्विचार करून, हे घटक विनाविलंब अभ्यासक्रमात पुन्हा समाविष्ट करण्यासंबंधीची सूचना जारी करावी म्हणून, महाराष्ट्रातील प्रत्येक घटना संरक्षक नागरिकांनी chmn-cbse@nic.in आणि minister.hrd@gov.in या पत्त्यांवर ई-मेल पाठवावेत, असे आवाहन या मोहिमेचे समन्वयक लोकशाहीर संभाजी भगत, डॉ. महेश केळुसकर, मारुती शेरकर यांनी केले आहे.


मा. मनुष्यबळ विकासमंत्री व CBSE चेअरमन यांना पुढील मेल करून आपला विरोध नोंदवा

मेलचा मजकूर


माननीय मानव संसाधन विकास मंत्री,
भारत सरकार,

सी.बी.एस.ई. पाठ्यक्रम से लोकतांत्रिक अधिकार, धर्मनिरपेक्षता, नागरिकता, सामाजिक आंदोलन तथा स्त्री शिक्षा पर पाठ भी हटा दिया गया है।

हम इस निर्णय का विरोध करते है। विद्यार्थियों को लोकतांत्रिक प्रक्रिया समझाने के उद्देश्य से विद्यार्थियों को ये सब सीखाया जाना चाहिए। इसलिए ये सभी अध्याय फिर से पाठ्यक्रम में समाविष्ट किये जाने चाहिए।


हा मजकूर पुढील मेल आयडीवर मेल करावेत.

info.cbse@gov.in

minister.hrd@gov.in

chmn-cbse@nic.in

आपलं सरकार

Click to listen highlighted text!