CoronaAurangabadUpdate : कोरोनाचे उपचार घेणार्‍या पोलिसाचे घर फोडले, दोन लाखांचा ऐवज लंपास

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी कुटुंबासह कोरोनाबाधित झाल्यामुळै उपचारासाठी अॅडमिट असतांना चोरट्याने गच्चीवरुन प्रवेश करंत दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक जनार्दन जाधव (वय अंदाजे ५०) रा. भगतसिंगनगर असे पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. हे गेल्या ५ जुलै पासुन घरातील सहाजण कोरोना बाधित असल्यामुळे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात अॅडमिट होते.
दि. ५ जुलै रोजी अशोक जाधव आणि त्यांच्या मुलाचा सुरवातीला स्वॅब घेतला असता ते पाॅझिटिव्ह आले.म्हणून घरातील पत्नी, मावससासू, भाचा आणि अचानक आलेला पाहुणा सगळ्यांच्या टेस्ट करण्यासाठी बोलावले.घाई गडबडीत जाधव यांच्या पत्नीने घराचा फक्त मुख्य दरवाजा लावला.व तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आले.सर्वांच्या तपासण्या होताच सगळे पाॅझिटिव्ह निघाल्यामुळे त्यांना ताबडतोब अॅडमिट करुन घेण्यात अाले.

Advertisements

दरम्यान चोरट्यांनी गच्चीवरुन घरात प्रवेश करत साडेसहातोळे सोने, २५ तोळे चांदी आणि २२ हजार रु. रोख असा १लाख ९५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. आज अशोक जाधव घरी परतले असता त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. जाधव यांच्या फिर्यादीवरुन हर्सूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेले चार दिवस पाऊस असल्यामुळे श्वान पथकाला माग काढता येणे शक्य नसल्याचे तज्ञांनी सांगितल्यानंतर घटनास्थळावरचे फिंगरप्रिंट पोलिसांनी घेतले.पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पांडुरंग भागिले करंत आहेत

Advertisements
Advertisements

आपलं सरकार