Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : कोरोना टेस्ट आपल्या दारी…..आजार अंगावर न काढण्याचे मनपा प्रशासकांचे आवाहन

Spread the love

कोरोना आजार किंवा या आजाराचे लक्षणे असल्यास अंगावर ना काढता चाचणी करून घ्या कारण हा आजार जर तीव्र झाला तर प्राण देखील घेऊ शकतो, आपण आपली काळजी घ्या आणि महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेली अँटीजन चाचणीचा लाभ घेऊन आपले कोविड टेस्ट करून आपण निरोगी आणि स्वस्थ असल्याची खात्री करून घ्या, असे आवाहन आज औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांनी जनतेस केले.

आज आस्तिककुमार पांडेय यांनी नेहरू नगर, भवानी नगर आणि अमृत साई प्लाझा, रेल्वे स्टेशन जवळ, या भागांची पाहणी केली आणि तेथील अँटीजन टेस्टचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कॉन्टेकट मॅपिंग ( संशयितांचे शोध घेणे) यावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना दिली.तसेच कंटेन्मेंट झोन मधील संशयित सर्व नागरिकांचे 100% टेस्टिंग करण्यात यावे.पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या 200 ते 500 मीटर परिसरातील सर्व नागरिकांचे टेस्टिंग करण्यात यावी .व 50 वर्षा वरील संशयित नागरिकांची माहिती घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी .तसेच पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील कमीत कमी 15 जणांची टेस्टिंग झाली पाहिजे या गोष्टीवर त्यांनी विशेष भर दिला .यासाठी त्यांनी नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात यामध्ये सहभागी होऊन लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले .या सर्व ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला .

यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर आणि विधी सल्लागार तथा टास्क फोर्स प्रमुख श्री अपर्णा थेटे यांची उपस्थिती होती.या परिसर सोबतच शहरातील महानगरपालिका वॉर रूम रूम, बायजीपुरा,बाबर कॉलनी ,बेगमपुरा,मयूरपार्क, शिवाजीनगर, नक्षत्रवाडी, शांतिनिकेतन कॉलनी ,समता नगर ,चौधरी हेरिटेज या ठिकाणी सुद्धा नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आल्या. तसेच उद्या दि 15 जुलै रोजी शहरातील न्यायनगर ,जयभवानी नगर,प्रगती कॉलनी,एन 6 संभाजी कॉलनी,रामनगर येथील नागसेन बुद्ध विहार ,शंभू नगर,बालाजी नगर ,शिवशंकर कॉलनी,पांढरी बाग जिन्सी, चेतना नगर ,व रेल्वे स्टेशन येथे कोरोना चाचणी होणार आहे .या करीता जास्तीत जास्त नागरिकांनी स्वतः हुन कोरोना चाचणी करून घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका यांच्या वतीने करण्यात येत आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!