MaharashtraPoliceUpdate : राज्यात 1201 पोलीस कोरोनाबाधित, 78 जणांचा मृत्यू

Spread the love

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ७४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ३२४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ९१ हजार ०८३ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १२ जुलै या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१० (८७० व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०६ हजार ७६६

राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०१ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ९१ हजार ४६.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ७८

(मुंबईतील ४५ पोलीस व ३ अधिकारी असे एकूण ४८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,  नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५,  ठाणे ग्रामीण १ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड २, जालना एसआरपीएफ १, अमरावती शहर १,  उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी)

कोरोनाबाधित पोलीस – १४० पोलीस अधिकारी व १०६१ पोलीस कर्मचारी

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.