Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationNewsUpdate : युजीसी परीक्षा घेण्यावर ठाम , पालक , विद्यार्थी आणि राज्य सरकारांचा मात्र देशभरातून विरोध

Spread the love

युजीसी आणि राज्य सरकार यांच्यातील परीक्षांच्या कारणावरून वाद विवाद चालू आहे.  दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्ष परीक्षांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याचे म्हटले आहे. यूजीसीनेअसेही म्हटले आहे की यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांमुळे टर्म असेसमेंटमध्ये समानता येईल. कोविड – १९ महामारीमुळे जगभरची सर्वोत्तम विद्यापीठे देखील ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करत आहेत, पण परीक्षेशिवाय प्रमाणपत्र किंवा पदवी देत नाहीत. यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार, पदवीच्या अंतिम वर्षांच्या अंतिम सत्र परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. पण यूजीसीने विद्यापीठांना निर्देश दिले आहेत की परीक्षेच्या माध्यमात लवचिकता असायला हवी. टर्मिनल सेमिस्टर / अंतिम सत्र परीक्षेत तीन्ही पद्धती ऑफलाइन, ऑनलाइन आणि ऑफलाइन-ऑनलाइन यांचा संमिश्र वापर करायला हवा. दरम्यान, सोमवार १३ जुलै रोजी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची मंत्रालयात बैठक होणार आहे. राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची ही बैठक होईल.

दरम्यान केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचा विद्यापीठ परीक्षा घेण्याच निर्णय पालक, विद्यार्थ्यांना रुचलेला नाही. देशात कोविड – १९ संसर्गाची संख्या कमी झालेली नाही. या वातावरणात घराबाहेर पडून परीक्षा केंद्रापर्यंत जाऊन परीक्षा देणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नाही, असे पालक-विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, प. बंगाल, पंजाब, ओडिशा आणि नवी दिल्ली या राज्यांनी पदवी परीक्षा रद्द केल्या आहेत.

महाराष्ट्रात विशेषत: शहरी भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. राज्यातील अनेक महाविद्यालये, विद्यापीठे क्वारंटाइन सेंटर्स किंवा तत्सम करोना संदर्भातील उपाययोजनेसाठी वापरली जात आहेत. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा शक्य नाहीत शिवाय विद्यार्थ्यांकडे यंत्रणेचा अभाव असल्याने ऑनलाइन परीक्षाही शक्य नाहीत. एकूणात सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घ्याव्यात अशी स्थिती महाराष्ट्रात नाही, अशी राज्याची भूमिका आहे.  कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर पदवीच्या अंतिम सत्र परीक्षा वगळता अन्य सर्व परीक्षा विद्यापीठांनी रद्द केल्या आहेत. अन्य सत्रांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाले आहेत. त्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!