Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationNewsUpdate : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर

Spread the love

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाने सुप्रीम कोर्टाला २६ जून रोजी सांगितल्यानुसार १५ जुलैच्या आधी निकाल लावण्यात आला आहे. उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.७८ टक्के आहे. एकूण १२ लाख ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ११ लाख ९२ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

एकूण १२ लाख ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षीचा निकाल मागील वर्षीच्या तुलने ५.३८ टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी ८३.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. महाराष्ट्र ज्या क्षेत्रांतर्गत येते त्या चेन्नई क्षेत्राचा निकाल ९६.१७ टक्के इतका लागला आहे.

असा पाहा निकाल

१) निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbseresult.nic.in वर जा

२) वेबसाइटवर दिलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

३) आपला रोल नंबर टाका

४) आता तुम्ही तुमचा निकाल पाहू शकाल.

५) भविष्यातील माहिती वा अन्य कामकाजासाठी निकालाची प्रिंटही घेऊ शकाल.

निकाल एका दृष्टिक्षेपात –

परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या – १२,०३,५९५

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – ११,९२,९६१

उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – १०.५९,०८०

निकालाची एकूण टक्केवारी – ६६.७८

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – ८६.१९

एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी – ९२.१५

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनीही निकाल जाहीर होताच ट्विटरवरून माहिती दिली आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बोर्डाने म्हटले आहे कि , ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल सामान्य पद्धतीने जाहीर होईल. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी तीनहून अधिक पेपर दिले आहे, त्यांचा उर्वरित विषयांचे गुण हे त्यांनी दिलेल्या पेपरपैकी सर्वोत्तम तीन विषयांच्या सरासरीएवढे असतील. ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत तीन पेपर दिले आहेत, त्यांना उर्वरित विषयांसाठी सर्वोत्तम दोन विषयांच्या सरासरीएवढे गुण मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांचीच परीक्षा दिली आहे, त्यांचा निकाल बोर्डातील कामगिरी आणि अंतर्गत मूल्यमापन, प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण आदींच्या आधारे लावला जाणार आहे. बारावीचे विद्यार्थी कोविड १९ परिस्थिती सामान्य झाल्यावर श्रेणीसुधार परीक्षा देऊ शकणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय लागू नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!