EducationNewsUpdate । Maharashtra : मोठी बातमी : काहीही झाले तरी महाराष्ट्रात परीक्षा नाही, मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत झालेल्या या बैठकीत परीक्षा घेऊ नये ही भूमिका कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ‘परीक्षा घेऊ नये ही भूमिका आपत्ती व्यवस्थपन समिती ने कायम ठेवली . आजची कोविडची परिस्थिती पाहता परीक्षा घेणं शक्य नाही. अनेक महाविद्यालयात क्वारन्टाइन सेंटर करण्यात आले आहेत. मागच्या परिस्थिती पेक्षा आताची कोविड संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे,’ असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.

Advertisements

एटीकेटी बाबत सर्व कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेतला असून बंगळुरूमध्ये 50 जणांची पारीक्षा घेतली यात निम्म्या विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाल्याने राज्यात परीक्षा घेतल्यास  हजारो विद्यार्थ्यांची जबादारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री म्हणाले कि , वाईन शॉप आणि विद्यार्थी यांची तुलना करू नका, पालक आणि विद्यार्थी या सर्वांनी या परीक्षेला विरोध केला आहे. राज्य सरकारला कुठला इगो नाही. राज्यात 12 हजार कंटेन्मेंट झोन असून या मध्ये 1 कोटी लोक आहेत, मग येथील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार? त्यामुळे युजीसीने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये असा इशाराही सरकारने दिला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार