AurangabadCrimeUpdate : लाॅकडाऊन मधला चौथा खून, पैशाचा तगादा आला अंगलट….

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – निवृत्त एस.टी. चालकाचे उसने घेतलेले साडेचार लाख रु.परत करण्याची इच्छा नसल्यामुळे कारकुनाने कारमधे बसवून मजूराच्या मदतीने लोखंडी राॅडने डोक्यात वार केला व मुंडके धडावेगळे करंत खून केला व मृतदेह सोलापूर हायवेवरील विहीरीत फेकून दिला.या प्रकरणी मयताची १० जुलै रोजी मिसींग तक्रार क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दाखल होती. या प्रकरणीॅ आता खुनाचा गुन्हा क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Advertisements

काजी अतिकोद्दीन समीयोद्दीन (३५) रा.एस.टी.काॅलनी कटकटगेट धंदा कारकून, अफरोज जलीलखान(३६) रा. रेणूकामाता मंदीर सातारा धंदा मजूरी अशी अटक आरोपींची नावे आहेत.आरोपींनी मुजीबशेख (५९) रा.शहानगर बीडबायपास यांचा उसने घेतलेले पैशे परत करावे लागू नये म्हणून खून केला.
९ जुलै रोजी दुपारी पावणे तीन वाजता मयत मुजीब शेख हे घरी सांगून निघाले होते की, ते काजी अतिकोद्दीन कडे उसने दिलेले ४लाख ५०हजार रु.परत मागण्यासाठी जात आहेत.

Advertisements
Advertisements

जानेवारी २०२०मधे आरोपी काजी ने मुजीबशेख यांच्याकडून ४लाख ५०हजार रु.उसने घेतले होते. पण आरोपी काजी पैशे वापस करण्यास टाळाटाळ करंत होता. ९ जुलै रोजी मुजीब शेख आरोपी काजी कडे गेले असता काजीने कार मधे बसवून बीडबायपास रस्त्यावर राहात असलेला मजूर अफरोज जलीलखान याला सोबंत घेतले. व रेणूकामाता मंदीर कमानीतून सोलापूर हायवेकडे जाणार्‍या रस्त्यावर डावीकडे २०० मीटर अंतरावर असलेल्या विहीरीजवळ नेत मुजीब यांना बाहेर काढले व डोक्यात लोखंडी राॅड घालून बेशुध्द केले. व नंतर मुंडके धडावेगळे करुन विहीरीत पोत्यात बांधून फेकून दिले हे सगळे कृत्य आरोपींनी साडेपाच पर्यंत करुन टाकले होते.

दरम्यान १०जुलै रोजी मयत मुजीब शेख यांचा मुलगा राशिदखान याने क्रांतीचौक पोलिसांशी संपर्क करंत वडिल हरवल्याची तक्रार दिली होती. व तक्रारीत उल्लेख केला होता की, मुजीबखान हे आरोपी काजी अतिकोद्दीन कडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले.त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आरोपी काजी अतिकोद्दीन ला दोन दिवस सारखे चौकशीसाठी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात बोलावले.पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातांना काजीची भंबेरी उडंत हौती.पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी एपीआय राहूल सूर्यतळ यांना काजीला पोलिसी हिसका दाखवण्याचे आदेश देताच काजी अतीकोद्दीन ने वरील गुन्ह्याची कबुली दिली.ही कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल देवकर, एपीआय राहूल सूर्यतळ, पोलिस कर्मचारी नसीमखान, देवानंद मरसाळै, राजेश फिरंगे, राजेश चव्हाण यांनी पार पाडली.

आपलं सरकार