SangaliHonorKilling : प्रेम विवाह करून बहिणीसह गावात राहणाऱ्या बहिणीच्या पतीचा भावाने केला खून

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रेम विवाह केलेल्या बहिणीने गावात राहू नये असे सांगणाऱ्या भावाने अखेर तिच्या पतीचा भोसकून खून केल्याची घटना सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे. बहिणीशी प्रेमविवाह करून तिचा पती बहिणीला घेऊन गावातच राहात असल्याच्या रागातून ओंकार माने (वय २२) याचा खून करून आरोपी निखील सुधाकर सुतार हा स्वतःहून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाला हजर. शनिवारी रात्री उशिरा कवठेपिरान गावात घडलेल्या ऑनरकिलिंगच्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी ओंकारसह त्याला मदत करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.

Advertisements

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , ओंकार माने याने सहा महिन्यांपूर्वी गावातील तरुणीशी प्रेम विवाह केला होता. कुटुंबीयांचा विरोध असल्याने निखिल सुतार याच्या बहिणीने घरातून पळून जाऊन ओंकारसोबत लग्न केले होते. लग्नानंतर हे नवदाम्पत्य जिल्ह्याबाहेर राहत होते. काही दिवसांपूर्वीच ओंकार पत्नीसह गावात आला होता. त्याने गावात राहू नये असा सुतार कुटुंबीयांचा आग्रह होता. यावरून निखील सुतार आणि ओंकार माने या दोघांमध्ये वादही झाला होता. मात्र, सुतार कुटुंबीयांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ओंकार माने हा पत्नीसह गावात राहण्यासाठी आला होता.

Advertisements
Advertisements

दरम्यान ओंकार हा शनिवारी रात्री उशिरा गावातील चव्हाण वाड्याजवळ थांबला होता. यावेळी अंधारातून आलेल्या निखील सुतारने ओंकारवर हल्ला केला. गुप्तीने पोटात वार केल्याने ओंकार जमिनीवर कोसळला. वर्मी घाव बसल्याने अतिरक्तस्रावामुळे ओंकारचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर हल्लेखोर निखील हा गुप्तीसह सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली. खुनाची घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ऑनर किलिंगच्या घटनेतून कवठेपिरानमध्ये तणाव वाढल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, महिनाभरात कवठेपिरानमध्ये खुनाची दुसरी घटना घडली.

आपलं सरकार