CoronaEffect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? चक्क स्टेट बँकेची नकली शाखाच सुरु केली , तीन महिन्यानंतर उघड झाला बनाव !!

Advertisements
Advertisements
Spread the love

कोरोनाच्या काळात कोणाचे काय तर कोणाचे काय ? अशी अवस्था झाली आहे .  तामिळनाडूमध्ये तर लॉकडाऊनच्या काळात अशी घटना घडली आहे कि , ज्याची कोणी कल्पनाही करणार नाही. येथील शिक्षित भामट्यांनी चक्क नकली भारतीय स्टेट बँकेची शाखा उघडून आपला काळा कारभार सुरु केला होता. हि बनावट शाखा उघडणार्‍या तीन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

Advertisements

या विषयीची अधिक माहिती अशी कि , कुडलोर जिल्ह्यातील परूट्टी येथे स्टेट बँकेच्या माजी कर्मचार्‍याच्या 19 वर्षांच्या मुलाने स्टेट बँकेची बनावट शाखा उघडली होती. आता स्टेट बँकेच्या मूळ शाखेच्या व्यवस्थापकाला हे सेटअप पाहून आश्चर्य वाटले. कारण ते पूर्णपणे स्टेट बँकेप्रमाणेच तयार केले गेले होते. आता पोलिसांनी तिघांना अटक करून तुरूंगात पाठविले आहे. एसबीआयच्या एका माजी कर्मचाऱ्याचा मुलगा कमल बाबूने संगणक, लॉकर, बनावट कागदपत्रे आणि इतर वस्तू बनावट बँकेत ठेवून अगदी बँकेसारखे तयार केले. अगदी पानरुटी मार्केटच्या नावाने एक वेबसाइट तयार केली गेली. अधिकारी तो सेटअप पाहून चाटच झाले. लॉकडाऊनमुळे या तरुणाने केलेला प्रताप समोर आल्यानंतर आता त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. पोलिसांनी कमल तसेच ए कुमार (वय 42) आणि एम माणिकम यांना अटक केली आहे. लॉक़डाऊनमध्ये या लोकांनी एप्रिलमध्येच शाखा उघडली.

Advertisements
Advertisements

दरम्यान एसबीआयच्या एका ग्राहकाने उत्तर बाजार शाखेत या शाखेबाबत चौकशी केली असता या बनावट शाखेची पोल उघडकीस आली. जेव्हा एका ग्राहकाने या बनावट शाखेतील स्लिप उत्तर बाजार शाखेच्या व्यवस्थापकाला दाखविले तेव्हा त्यांना धक्का बसला. जेव्हा ते बनावट शाखेत पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. कारण या बनावट बँकेतही सर्व काही मूळ शाखेप्रमाणे होते. आता पोलिसांनी या तिघांविरोधात भादंवि कलम 473, 496, 484 आणि 109 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आपलं सरकार