CoronaEffect : कोरोना टेस्टचा अहवाल येण्याआधीच क्वारन्टाइन असलेल्या व्यक्तीची आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

सर्वत्र कोरोनाची मोठी दहशत वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दरम्यान एका संशयित रुग्णाने कोव्हिड सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. गेवराई शहरातील कोव्हिड सेंटरमध्ये क्वारन्टाइन असलेल्या तुकाराम जगन्नाथ जाधव वय 35 असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

Advertisements

रुग्णालयाच्या सूत्रांनी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या सदर व्यक्तीचा स्वॅब शुक्रवारी  घेण्यात आला होता. त्याचा अहवाल येण्या आधीच त्याने क्वारन्टाइन सेंटरमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीने तुकाराम जाधव यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. ज्यावेळी तेथील न.प.कर्मचाऱ्यांनी त्यांचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले तेव्हा दार न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत हा व्यक्ती आढळून आला. त्यानंतर दरवाजा तोडून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार