Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 8464 : दिवसभरात 248 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 5061 कोरोनामुक्त, 3049 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 227 जणांना (मनपा 178, ग्रामीण 49) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5061 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 248 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 188, ग्रामीण 60) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8464 झाली आहे. आजपर्यंत एकूण 354 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3049 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 118 रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 106 रुग्णांची अँटीजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण : (93)

उमाजी कॉलनी, बन्सीलाल नगर (1), गजानन नगर (1), कांचनवाडी (1), न्यू गणेश नगर (3), जाधववाडी (2), एन अकरा (3), राजाबाजार (6), मसनतपूर (11), रेल्वे स्टेशन परिसर (2), इटखेडा (3), गजानन कॉलनी (6), केसरसिंगपुरा (11), शाह बाजार (1), एन सात आयोध्या नगर (25), एन बारा (17)

चेक पॉइंटवरील रुग्ण (24)

कांचनवाडी (8), हर्सुल (4), नगर नाका (6), दौलताबाद (1), चिकलठाणा (5)

ग्रामीण रुग्ण : (01)

गोंगरगाव, सिल्लोड (1)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील तीन विविध खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील अबरार कॉलनीतील 48 वर्षीय पुरूष, राम नगरातील 70 वर्षीय स्त्री, न्यू श्रेय नगर येथील 70 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!