Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaEffect : कोरोनाबाधित पोलीस जमादाराला चार तास मिळाला नाही बेड, एका कर्तव्यदक्ष पोलीसाच्या मृत्यूमुळे हळहळ… !!

Spread the love

औरंगाबादच्या सहायक पोलिस आयुक्त उस्मानपुरा कार्यालयातील जमादार विजय पवार (वय ५१, शिवशंकर कॉलनी) यांचा काल  सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त शहरात पसरताच एका कर्तव्यदक्ष पोलीसाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर लोकांच्या संरक्षणासाठी परिश्रम घेणाऱ्या पोलिसालाच खासगी रुग्णालयात चार तास बेड मिळाला नाही याबद्दल संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांना तीन दिवसांपूर्वी  एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस दलातील कोरोनाचा हा पहिला बळी आहे.  पवार यांचा स्वॅब शनिवारी सकाळीच पॉझिटिव्ह आला होता.

विशेष म्हणजे विजय पवार हे सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात असतानाही ज्या ज्या ठिकाणी पोलीस म्हणून आपली सेवा हवी असेल त्या त्या ठिकाणी विजय पवार आपले कर्तव्य बजावताना दिसून येत होते . गेल्या तीन महिन्यांपूर्वी २३ एप्रिल रोजी शहानूरमिंया उड्डाणपुलावर आज पहाटे साडे सात वा. माॅर्निंगवाॅक करणार्‍या एका महिलेवर एका मोटरसायकलस्वाराने एकटी महिला पाहून बलात्काराचा प्रयत्न केला पण पोलिस हेडकाॅन्सटेबल विजय पवार यांच्या कानावर पीडित महिलेचा आवाज पडताच त्यांनी तिला बलात्कारापासून वाचवून तिला सुखरूप तिच्या घरी नेऊन सोडले होते. याशिवाय नवाबपुरा येथे काही वर्षांपूर्वी दंगल उसळली होती. या दंगलीत कर्तव्यावर असलेल्या पवार यांनी दंगेखोरांना रोखण्यासाठी जीव पणाला लावला होता. यावेळी झालेल्या दगडफेकीत पवार यांचा पाय तुटला होता. पवार व त्यांच्या परिवाराने स्वखर्च करून पायावर उपचार करून घेतले.

#CoronaVirusEffect : सावधान : वेळेवर पोलिसांची एंट्री झाली म्हणून “ती” बलात्कारातून वाचली अन्यथा, लॉकडाऊन असतानाही माॅर्निंग वाॅकचा छंद आला होता मुळावर !!

शहर पोलिस विभागात काम करणारे विजय पवार हे सातारा पोलिस ठाणे संलग्न सहाय्यक पोलिस आयुक्त उस्मानपुरा येथे कार्यरत होते. त्यांची तब्येत नऊ जुलै रोजी बिघडली. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने, पवार हे स्वत: एका खासगी हॉस्पीटलमध्ये गेले. १० जुलै रोजी मध्यरात्री पवार यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पवार यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना १० जुलैच्या मध्यरात्री खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, खासगी रुग्णालयाने बेड रिकामे नसल्याने कारण सांगून त्यांना चार तास ताटकळत ठेवले. सकाळी सहाच्या सुमारास त्यांना उपचारासाठी बेड मिळाला. पवार यांचा स्वॅब १० जुलैला दुपारी घेण्यात आला. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. ११ जुलैला सकाळी त्यांचा स्वॅब रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. दुपारी पाचच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. पवार यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. पोलिस खात्यात मनमिळावू आणि सर्वांना सहकार्य करण्याची सवय असलेला कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती.

कायम कर्तव्यतत्पर विजय पवार

दिवंगत विजय पवार यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्याविषयी अधिक माहिती देताना विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डेपाटील म्हणाले कि , विजय पवार कधीही अडचणीच्या वेळी फोन केला किंवा कोणाला काही मदतीची गरज असेल तर आपली ड्युटी असो नसो ते तत्काळ धावून जात असत. त्यांच्या जाण्याने आम्हाला तीव्र दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल स्वतः मुंडण करून गोर्डे पाटील यांनी शोक व्यक्त केला.  या जाँबाज पोलीस कर्मचाऱ्याला महानायक ऑनलाईनची भावपूर्ण आदरांजली. दरम्यान, औरंगाबाद शहर पोलिस दलात आतापर्यंत एकूण ५७ जण करोनाबाधित झाले आहेत. त्यातील ३२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २५ पोलिस कर्मचारी उपचार घेऊन बरे झाल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!