Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : SocialMedia : तुमच्या फोनवर आलेली ” ती ” व्हिडीओ क्लिप नकली, पॅनिक होऊ नका : मुंबई पोलीस

Spread the love

आजकाल पब्लिसिटीसाठी कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. आपल्या WhatsApp वर आलेली पोलिसांची व्हिडीओ क्लिप पूर्णतः अफवा आहे असे सांगण्याची वेळ मुंबई पोलिसांवर आली आहे. दरम्यान या क्लिपमुळे चांगलीच  खळबळ उडाली आहे.   १४० आकड्याने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून फोन आल्यास घेऊ नका, आर्थिक फसवणूक होईल, अशी सूचना पोलीस वस्त्या-वस्त्यांमध्ये देत आहेत, अशा ध्वनिचित्रफिती शुक्रवारी संध्याकाळी समाजमाध्यमांवरून व्हायरल झाल्या आणि एकच घबराट पसरली. त्यानंतर ही एका वाहिनीवरील मालिकेची जाहीरात असून या अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी तातडीने केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये पोलीस वाहनातून फिरताना दिसत असून पोलीस उद्घोषणा करीत आहेत. १४० आकड्यापासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरचे आलेले फोन उचलल्यास बॅंकतील सर्व रक्कम काढली जाईल, असे या उद्घोषणेत सांगितले जात आहे. एका खासगी टीव्ही वाहिनीने आपल्या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी केलेले हे चित्रीकरण आहे. मात्र तसा कोणताच खुलासा यामध्ये नसल्याने खरेखुरे पोलीसच या सूचना करीत असल्याचे नागरिकांना वाटले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला.

नागरिकांनी एकमेकांना समाजमाध्यमांवरून ही ध्वनीचित्रफित पाठवली. मात्र मुंबई पोलीस दलाने ही अफवा असल्याचे काही वेळातच ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. राज्याच्या सायबर विभागानेही तातडीने वाहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार लागलीच थांबवण्याची सूचना दिली. या प्रसंगाबाबत सायबर विभाग आपला अहवाल मुंबई पोलिसांना देणार आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून वाहिनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली गंभीर दखल

दरम्यान मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल झालेल्या या  कथित व्हिडीओने मुंबईकरांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस नागरिकांना सायबर गुन्हेगाराबाबत जनजागृती करीत “१४० किंवा ४० या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते”, असे या व्हिडिओमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल मेगा माईक वरून घोषणा करताना दिसतो. हा व्हिडिओ आणि त्याच सोबत व्हायरल झालेल्या मेसेजने मुंबईसह उपनगरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. मात्र हा व्हिडिओ आणि मॅसेजमुळे लोकं पॅनिक झाल्यामुळे अखेर याची गंभीर दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेतली, त्यानंतर जे सत्य बाहेर आलं ते संतापजनक आहे.

हा व्हिडिओ सोनी लाईव्ह या वाहिनेने आपल्या नवीन येणाऱ्या एका सिरीयलचे प्रमोशन करण्यासाठी तयार केल्याचे कळते आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मुंबई पोलिसांचा नसून सोनी लाईव्ह वाहिनेने तयार केला असून त्यांच्या प्रमोशनसाठी तो व्हायरल करण्यात आला असल्याची महिती समोर येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने या व्हिडीओ ची दखल घेतली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!