VikasDubeEncounter : पूर्ण स्टोरी एका नजरेत : “त्या” ८ पोलिसांना मारणारा क्रूरकर्मा विकास दुबेचा एनकाऊंटरमध्ये खातमा…

Advertisements
Advertisements
Spread the love

कोण आहे विकास दुबे?

विकास दुबे मूळचा कानपूरजवळच्या बिकरु गावचा आहे. दुबेला दोन मुलं आहेत, त्यातला एक इंग्लंडमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतोय, तर दुसरा कानपूरमध्येच शिकतोय. गेल्या 15 वर्षात एकदाही बिकरु गावात निवडणूक झाली नाही, शिवाय झेडपीतही दुबेच्याच कुटुंबाचा सदस्य निवडून जातो. आताही विकास दुबेची पत्नी ऋचा दुबे झेडपी सदस्य आहे. बिकरुसह आजूबाजूच्या गावांमध्ये विकास दुबेच्या परवानगीशिवाय कुणी ग्रामपंचायतीलाही उभं राहू शकत नाही. आधी भाजप मग बसपा आणि सपा या तिन्हीही पक्षात त्याने काम केले आहे. सरकारी कंत्राटापासून ते शाळा-कॉलेज उभी करुन त्यानं करोडोची संपत्ती कामवाली आहे.

हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे किमान 60 हून अधिक गुन्हे दुबेवर दाखल आहेत. 2001 मध्ये तर पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्यानं भाजपचे राज्यमंत्री संतोष शुक्लांची हत्या केली होती. मात्र त्या प्रकरणात एकाही पोलिसाची विकास दुबेविरोधात कोर्टात साक्ष देण्याची हिंमत झाली नाही. राजकारणात सक्रिय असल्यामुळेच विकास दुबेचा दबदबा वाढला. कानपूर आणि परिसरात त्याची दहशत वाढली.


उत्तर प्रदेश पोलिसांची हत्या करुन पसार झालेल्या विकास दुबेला मध्यप्रदेश पोलीसांनी पकडले खरे , पण त्याला  घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्याच्या गाडीला अपघात बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या ताफ्याच्या गाडीला अपघात झाला. या अपघातादरम्यान कार उलटी झाली. हि संधी साधून पोलीसाचे रिवाॅलव्हर हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणारा कुख्यात दुबे पोलीसांच्या चकमकीत मारल्या गेला. कानपूरच्या लाला लाजपत राय रुग्णालयातील डॉक्टरांनी विकास दुबे याला मृत घोषित केलं असून या चकमकीत जखमी झालेल्या पोलिसावर उपचार चालू आहेत.

Advertisements

मै विकास दुबे हू, कानपूरवाला….

कुख्यात विकास दुबेला मध्यप्रदेशातून उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती.  उत्तर प्रदेशातील ८  पोलिसांना ठार करून दुबे पसार झाला होता. दरम्यान पोलीस त्याच्या मागावर असताना तो मध्यप्रदेशातील उज्जैन येथे असल्याची टीप मध्य प्रदेश पोलिसांना लागली होती . उजैनच्या महाकाल मंदिरात रीतसर २५० रुपयांची पावती फाडून दर्शनासाठी तो मंदिरात पोहोचला होता. दरम्यान एका सुरक्षा रक्षकाला संशय आल्यानंतर त्याने  पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी उलटसुलट चौकशी करताच सगळी पोलखोल झाली. मात्र, त्याआधी दुबे बिनधास्त फोटोसेशन करत होता. अटक झाल्यानंतरही त्याला कुठलाही पश्चात्ताप झालेला दिसत नव्हता. गर्दीला पाहून ‘मै विकास दुबे हू, कानपूरवाला’ असं तो ओरडत होता.

Advertisements
Advertisements

क्रूरकर्मा दुबे “त्या” ८ पोलिसांचे मृतदेह जाळून टाकणार होता पण….

अखेर कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली होती. यानंतर केल्या गेलेल्या पोलिस चौकशीत विकास दुबेनं काही खळबळजनक माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, पोलिसांच्या हत्येनंतर तो त्या पोलिसांचे मृतदेह जाळू इच्छित होता. पोलिसांचे मृतदेह जाळण्यासाठी एकत्रित करण्यात आले होते. त्यासाठी तेल देखील आणले होते. विकासनं पोलिसांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले आहे. विकास दुबे म्हटलं होतं की, आम्हाला सकाळी पोलिस येणार आहेत, याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिस रात्रीच पोहोचले. आम्हाला भीती होती की, पोलिस एन्काऊंटर करतील, अशी माहिती चौकशीत विकास दुबेने  दिली होती.

कानपूरच्या बिकरू गावात आठ पोलिसांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्यानंतर फरार झालेला गँगस्टर विकास दुबे याने उज्जैनमध्ये पोलिसांसमोर स्वत: आत्मसमर्पण केल्याचीही माहिती समोर येत होती. त्यालाा पकडण्यासाठी पोलिसांनी अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. इतकंच नव्हे तर त्याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला होता.

आज झालेल्या त्याच्या एन्काऊंटर बद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हिस्ट्रीशीटर विकास दुबे याला मध्य प्रदेशच्या उज्जैनहून कानपूरला आणण्यात येत होतं. यावेळी एसटीएफच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. याच गाडीत विकास दुबे बसला होता. अपघातानंतर विकास दुबेने  एसटीएफच्या एका अधिकाऱ्याच्या हातातला पिस्तुल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विकास दुबेने  पोलिसांवर गोळीबार केला. तो पळून जात असलेला पाहून पोलिसांनीही त्याच्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या दरम्यान दुबे जखमी झाला आणि थोड्या वेळानं त्याचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला. या घटनेत चार पोलीस जखमी झाल्याची माहिती कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली आहे.


…त्याला पकडा आणि एन्काऊन्टरमध्ये ठार करा….

दरम्यान, पोलिसांची एक टीम दुबेच्या लखनऊच्या कृष्णा नगर भागात पोहचली होती. इथं दुबेची आई आपल्या छोट्या मुलासोबत राहते. दुबेच्या वृद्ध आईला आपल्या मुलाची करणी माहीत पडल्यानंतर तिनेही दुबेला ‘गोळ्या घालून ठार केलं पाहिजे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. विकास दुबे हा अगोदर भाजपचा कार्यकर्ता होता. त्यानंतर त्यानं बसपा आणि नंतर सपाचा मार्ग निवडला. गावकरी आणि राजकारणाने त्याला या मार्गावर आणून सोडल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईने दिली होती.  तो असाच पळत लपत छपत राहील तर पोलीस त्याला एन्काऊंटरमध्ये ठार करतील. त्यानंच स्वत:हून पोलिसांसमोर समर्पण करावं. मी तर म्हणते त्याला पकडा आणि एन्काऊन्टरमध्ये ठार करा. त्यानं खूपच वाईट कृत्य केलंय’ अशी प्रतिक्रिया या वृद्ध मातेनं आपल्याच मुलाविषयी व्यक्त केली.


“त्या ” दिवशीचा थरार , उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकार

८ पोलिसांना ठार करून पाळलेल्या विकास दुबेला  पकडणे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान होते . कारण  उत्तरप्रेदशातली कायदा सुव्यवस्थेला लज्जास्पद अशी हि घटना होती. दरम्यान पोलीस पोहचल्याचा पत्ता लागल्यावर विकास दुबे याच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलीस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना वीरमरण आले. विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी आहे. दुबेच्या विरोधात 50 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खुन, अपहरण, खंडणी सारखी प्रकरणे आहेत. विकास दुबेने  2001 मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती. गँगस्टर विकास दुबे फरार झाल्यानंतर त्याच्या साथीदारांची धरपकड केली गेली. त्याचवेळी त्याचा ‘डावा हात’ समजला जाणारा अमर दुबे याला एन्काउंटरमध्ये ठार केलं होतं. हमीरपूर येथे चकमकीदरम्यान पोलिसांच्या हातून अमर मारला गेला. तर फरीदाबाद येथून विकासच्या आणखी एका साथीदाराला पकडण्यात आले आहे.

 

आपलं सरकार