Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : अँटीजन टेस्टद्वारे 1851 जणांची स्वॅब तपासणी 65 जण पॉजिटीव्ह

Spread the love

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रुग्णाचे निदान लवकर होण्यासाठी आता अॅण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. याद्वारे आज शहरातील विविध ठिकाणी एकूण 1851 जणांचे स्वॅब घेण्यात आले.त्यापैकी 65 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी नागरिकांची अॅण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे.यामध्ये हर्सुल जेल क्वार्टर येथे 234 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली त्यापैकी 19 पॉझिटिव्ह आले तर एकनाथ नगर येथे 73 पैकी पाच पॉझिटिव्ह, विशाल नगरमध्ये 111 पैकी पाच पॉझिटिव्ह,एन-फोर येथील 102 पैकी तीन पॉझिटिव्ह, विठ्ठल नगरमध्ये 64 पैकी एक पॉझिटिव्ह तर गांधी नगरमध्ये 117 पैकी आठ, नक्षत्र वाडीत 100 पैकी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.तर वसंत विहार मध्ये 222 तपासणी केली आणि कामगार नगरमध्ये पन्नास जणांची तपासणी केली मात्र या दोन्ही ठिकाणी एक ही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
या ठिकाणांसह शहरातील चेक पॉइंटवरही अॅण्टीजन टेस्ट करण्यात आली.यामध्ये दौलताबाद टि पॉइंटवर 61 जणांचे स्वॅब तपासण्यात आले त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले तर झाल्टा फाटा येथे 197 पैकी आठ , नगरनाका येथे 177 पैकी दोन , चिकलठाणा येथे 170 पैकी एक,हर्सुल टि पॉइंट येथे 118 पैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . तर कांचनवाडी चेक पॉइंटवरील तपासणी केलेल्या 55 पैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. या विविध ठिकाणी एकूण 1851जणांचे स्वॅब तपासण्यात आले.

शहरात विनाकारण फिरणाऱ्या १५२ वाहनधारकांवर कारवाई

औरंगाबाद  शहरात आज सायं ६ वाजे पर्यंत सांचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या १५२ वाहनधारकांची वाहने ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.
पोलीस विभागाच्या वतीने कऱण्यात आलेल्या कारवाई सिडको- ४२,छावणी-१५, वाळूज-३८, शहर-३७ , एकूण १५२ वाहनधारकावर कारवाई करण्यात आली असून १८८ कलमा अंतर्गत २४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आली असल्याचे सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ नागनाथ कोडे यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!