Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshCrime : “त्या ” आठ पोलिसांना ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा विकास दुबेला पोलिसांनी असे बोलते केले….

Spread the love

उत्तर प्रदेशात त्याला अटक करण्यासाठी आलेल्या पथकातील ८ पोलिसांना गोळ्या घालणाऱ्या विकास दुबईला मध्य प्रदेश येथे अटक केल्यांनतर त्याला उत्तर प्रदेशात आणण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. दरम्यान, विकास दुबे याचा कबुलीजबाब समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकास दुबे याने पोलिसांसमोर घटनेच्या रात्रीविषयी माहिती दिली आहे. यातून सीओ आणि पोलीस कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या कशी केली गेली हे दर्शविते. इतकेच नव्हे तर पुरावा मिटवण्यासाठी पोलिसांचे मृतदेह जाळण्याचा कटदेखील करण्यात आला होता.

दरम्यान पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास दुबे याने  कानपूरमधील घटनेनंतर सांगितले की, त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या विहिरीजवळ पोलिसांचे मृतदेह एकाच्या वर एक असे  ठेवण्यात आले होते, जेणेकरून त्यांना पेटवून पुरावा नष्ट करता येईल. आग लावण्यासाठी घरात गॅलनमध्ये रॉकेल ठेवण्यात आले होते. एका  50 लिटर गॅलन रॉकेलने मृतदेह जाळण्याचा हेतू होता. परंतु मृतदेह गोळा केल्यानंतर जाळण्याची संधी मिळाली नाही आणि तो तेथून पळून गेला.

विकास दुबे याने आपल्या जबाबात शहीद सीओ देवेंद्र मिश्रा यांच्याविषयी सांगितले की, देवेंद्र मिश्रांसोबत माझे पटत नव्हते. बऱ्याचदा त्यांनी धमकी दिली होती. यापूर्वीही वादविवाद झाला होता. विनय तिवारी यांनीही सीओ आपल्या विरोधात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मला सीओंवर राग होता. सीओला समोरच्या घरात ठार मारण्यात आलं होतं. मी सीओला ठार मारले नाही, पण माझ्या बरोबरच्या माणसांनी दुसर्‍या बाजूच्या आवारातून उडी मारली आणि मामाच्या घराच्या अंगणात त्यांना ठार मारले. त्याच्या पायावर देखील हल्ला करण्यात आला होता. गोळी जवळून डोक्यात मारण्यात आली होती, त्यामुळे अर्धा चेहरा फाटला होता, अशी माहिती विकास दुबे याने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!