Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : 3 दिवसांत मंत्रालायातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू, पुण्यातही कोरोनाचा कहर चालूच….

Spread the love

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत हजारांनी वाढ होत आहे. राज्यात राज्यात गेले काही दिवसांपासून 6000 वर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, गेल्या 3 दिवसांत मंत्रालायातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मृत कर्मचाऱ्यांमध्ये विधिमंडळ मंडळातील क्लार्क, जलसंपदा विभागातील क्लार्क आणि नगर विकास विभागाचा मंत्री कार्यालयातील शिपाईचा समावेश आहे.  मिळालेली माहिती अशी की, गेल्या 2 आठवड्यापासून तिघे कर्मचारी आजारी होते. आजारी पडण्याआधी तिघे मंत्रालयात ड्युटी करत होते. मात्र, तिघांवर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आता मंत्रालयातील कामगार विभागात शिपाईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यातही कोरोनाचा कहर….

दरम्यान पुण्यातही सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींना कोरोनाने घेरले आहे . पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील ८ जणांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांची पत्नी, मुलगी, आई यांना करोनाची लागण झाली असून घरातील लहान मुलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच मोहोळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्याचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता यांच्या संपर्कात आले होते.

महापौर मुरलीधर मोहोळ यांना तापाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची करोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांतील १८ जणांची टेस्ट करण्यात आली. त्याचे रिपोर्ट आज आले असता घरातील एकूण ८ जणांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. मोहोळ यांची पत्नी, मुलगी आणि आई यांना करोनाची लागण झाली असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. तर घरातील लहान मुलांना करोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरातच क्वॉरंटाइन करण्यात येणार आहे. करोनाची लागण झालेल्या ८ जणांमध्ये मोहोळ यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. अजून १० जणांचे रिपोर्ट यायचे बाकी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पुणे शहरात करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी पुन्हा जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे.  प्रतिबंधित क्षेत्रात नियमभंग करणाऱ्यांवर आणखी कडक कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!