Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : कोरोना टेस्टबाबत आता राज्य सरकार घेणार हा निर्णय…

Spread the love

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.  या निर्णयानुसार राज्यात आता कोरोनाचे लक्षण नसलेल्या नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान , मास्कचा काळाबाजार करू नये. मास्क किंमत सर्वत्र स्थिर असावी. यासाठी सरकार लवकरच भूमिका घेणार असल्याचंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. गोलेबल हॉस्पिटल गायकवाड प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

राज्यात  एकूण संख्या आता 223724 एवढी झाली आहे. तर  एकूण 123192 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 91084 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 9448 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात  तब्बल 21129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 269789पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 21 हजारांहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!