Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : जाणून घ्या आजची महाराष्ट्राची अवस्था , रुग्ण सुधारणेचा दर ५५ टक्केहुन अधिक

Spread the love

राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजार 875 कोरोना रुग्ण  आढळून आले असून 219 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजार 599 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 55 टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण 4.19 टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 18 . 86 टक्के इतकी आहे.

दरम्यान राज्यात गेल्या नऊ दिवसात ३४ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१९ टक्के असून आज कोरोनाच्या ४०६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले.आतापर्यत एकूण संख्या १ लाख २७ हजार २५९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६८७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख  २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४८ हजार १९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २१९ मृत्यू हे मुंबई मनपा-६८, ठाणे-८, ठाणे मनपा-२०, नवी मुंबई मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-३, भिवंडी-निजापूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-३, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-९, पनवेल मनपा-८, नाशिक-३, नाशिक मनपा-१, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, जळगाव-६, जळगाव मनपा-१, नंदूरबार-२, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-४, सोलापूर मनपा-४, सातारा-३, जालना-१, लातूर मनपा-१,नांदेड-१,अमरावती-१,नागपूर-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

काल राज्यात 24 तासांमध्ये उच्चांकी 6603 कोरोनाबाधित रुग्णांची  भर पडली होती तर 198 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रशासन अधिक गंभीर झाले आहे. नागरिकांमध्ये कोरोनाचा मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यात आता कोरोना लक्षणविरहीत नागरिकांचीही टेस्ट केली जाणार आहे, अशा माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील नागरिकांच्या जास्तीत जास्त टेस्ट कराव्यात, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहे. त्यामुळे आता प्रिस्क्रीपशन शिवाय देखील कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत, असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कोरोनावर लवकरच औषध सापडलं नाही तर भारतात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. फेब्रुवारी 2021 पासून भारतात दररोज 2.87 लाखांच्या जवळपास नवे रुग्ण आढळून येऊ शकतात असा अहवाल  जगविख्यात MIT (Massachusetts Institute of Technology)ने दिला आहे. जगभरातल्या 84 देशांच्या टेस्टिंग आणि कोरोना रुग्णांचा अभ्यास करून MITच्या तज्ज्ञांनी हा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2021पासून भारतात दररोज तीन लाखांच्या जवळपास रुग्ण येऊ शकतात. असं झालं तर ते फार मोठं संकट असेल आणि जगात भारत सर्वाधिक रुग्णांचा देश बनेल असेही  या अहवालात  म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!