Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronamaharashtraUpdate : राज्यात लवकरच अँटी व्हायरल औषधी , आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव येथील परिस्थिती तर चिंताजनक आहे. दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना औरंगाबादेत मोठी घोषणा केली आहे. अँटी व्हायरल औषधी लवकरच राज्यात येणार आहे. आम्ही स्वतः वाट पाहत आहोत. सिपला कंपनीनं लवकर औषधी देण्याचे मान्य केल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

औरंगाबाद घाटी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात येणार आहे. 10 प्लाझ्मा थेरपीमधील 9 थेरपी यशवी ठरल्या आहेत, असंही टोपेंनी यावेळी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग रोखणारे औषधी मुबलक पुरवठा करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. खासगी दवाखान्यात आव्वा ते सव्वा बिल आकारता येणार नाहीत. तसेच वरिष्ठ पदस्थ डॉक्टरांनी कोविड आयसीयूमध्ये प्रत्येक तासाला लक्ष घालावे, अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे शिवसेनेचे नेते नितीन साळवी यांचे निधन झालं आहे. त्यानंतर आता आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील पडेगाव परिसरातील नगरसेवक रावसाहेब आमले यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. बुधवारी पहाटे 4 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. रावसाहेब आमले यांच्यावर प्लाझ्मा थेरपी होणार होती. मात्र, थेरपी करण्याआधीच त्यांच्यावर मृत्यू ओढावला.

ददरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी 142 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 88 तर ग्रामीण भागातील 54 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 90 पुरूष तर 52 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7646 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4033 रुग्ण बरे झालेले असून 335 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3278 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!