Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiUpdate : Rajgruha Vandalism : राजगृहावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त , आनंदराज आंबेडकर राजगृहाकडे न येण्याचे आवाहन

Spread the love

काल सायंकाळच्या सुमारास अज्ञात माथेफिरूंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर राज्यात आणि देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या घटनेमुळे शासकीय यंत्रणा जागी झाली आहे . या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजगृह परिसरात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राजगृहला छावणीचं स्वरूप आलं आहे. राजगृहाकडे येणाऱ्या रस्त्यांवरही पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रस्ते वाहतूक सुरू असली तरी वाहनांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी राजगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवले असून अधिक तपास सुरू आहे.

MubaiUpdate : राजगृह तोडफोड प्रकरण : राजगृह संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान, मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

याबाबतची अधिक माहिती अशी कि , काल मंगळवारी सायंकाळी ६च्या सुमारास अज्ञात व्यक्तिंनी राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची नासधूस केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून पळ काढला. या घटनेचं वृत्त पसरताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राजगृहाबाहेर आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात तीन वायरलेस आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच राजगृह परिसरात येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

आनंदराज आंबेडकर यांचं जनतेला जाहीर आवाहन

दरम्यान राजगृहावरील हल्ला निषेधार्ह आहे. मात्र आंबेडकरी जनतेने संयम बाळगावा. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू आहे. त्यामुळे कुणीही राजगृह परिसरात येऊ नये. तुम्ही राहत असलेल्या जिल्हाधिकारी-तहसिलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करा. पण लॉकडाऊनच्या नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केलं आहे. तर बाबासाहेबांचं घर हे आमच्या अस्मितेचं प्रतिक आहे. बाबासाहेबांच्या घरावरील हल्ला सहन केला जाणार नाही, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे.

MumbaiUpdate : Rajgruha Vandalism : समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य, आरोपीना कठोर शासन : अजित पवार

काल सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी इमारतीच्या आवारात शिरून मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस केली आहे. घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबेडकर कुटुंबीयांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे दिले असून संबधित माथेफिरू हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

BreakingNews : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! आंबेडकर कुटुंबियांचे आवाहन

आपलं सरकार

Click to listen highlighted text!