Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrime : महाराष्ट्र ग्रामीण बँकेस ४२ लाखाला गंडविणारा मुख्य आरोपी सह दोन फरार घरफोडे गजाआड

Spread the love

औरंंंगाबाद : बनावट सोने गहान ठेवुन व्हॅल्यूअरच्या मदतीने टाउन सेंटर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला ४२ लाख ६३ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी वकील गंगाधर नाथराव मुंढे (४०, ज्योति नगर) याला मंगळवारी (दि. ७) गजाआड केले. त्याला गुरुवारपर्यंत (दि. ९) पोलिसकोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमणे यांनी दिले.
प्रकरणात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या टाउन सेंटर सिडको येथील शाखेचे अधिकारी अच्यूत दत्तराव दुधाटे यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, वकील गंगाधर मुंढे व मंगेश नाथराव मुंढे या दोघांनी गोल्ड व्हॅल्यूअर रमेश उदावंत याच्या सहाय्याने बनावट सोने बँकेत ठेवुन ४२ लाख ६३ हजार रुपयांचे कज घेतले होते. ठेवलेले सोने बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर गंगाधर, मंगेश मुंढे व गोल्ड व्हॅल्यूअर रमेश उदावंत यांच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वर्षभरापूर्वी घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार गजाआड

औरंंंगाबाद : सेव्हन हिल परिसरातील सुराणानगर येथे वर्षभरापूर्वी घरफोडी करणाNया दोन अट्टल घरफोड्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले. अटक केलेल्या दोन्ही घरफोड्यांना न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस.वमने यांनी शुक्रवारपर्यंत (दि.१०) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष उर्पâ मुकेश उर्पâ बांग्या गणेश रामफळे (वय २३, रा.जयभीमनगर, टाऊन हॉल), प्रशांत कचरू ठोंबरे (वय २७, रा.राधास्वामी कॉलनी, हर्सुल) असे पोलिसांनी अटक केलेल्या घरफोड्यांची नावे आहेत. सुराणा नगरात राहणाNया ज्योती प्रदीप मोहरीर (वय ४२) ह्या २७ जानेवारी २०१९ रोजी कामानिमित्त बाहेर गेल्या असताना चोरट्यांनी संधी साधून घराचा कडी कोंयडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने लोखंडी कपाटातून ४ लाख २४ हजार रुपये विंâमतीचे दागिणे आणि रोख ६० हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव, नरसिंग पोमनाळकर, सहाय्यक फौजदार नजीर पठाण, जमादार श्रीराम राठोड, रमेश भालेराव, परभत म्हस्के, विकास माताडे, अश्वीन होनराव, माधव चौरे, संदीप बिडकर, नितीन धुळे, शिवाजी भोसले, सरिता भोपळे, संजीवनी शिंदे, बाबर शेख, ज्ञानेश्वर पवार आदींच्या पथकाने टाऊनहॉल परिसरातील जयभीमनगर येथे सापळा रचून दोन्ही घरफोड्यांना गजाआड केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!