Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : लॉकडाऊनच्या काळात तासाभरामध्ये कळणार कोरोनाचा रिपोर्ट : आस्तिककुमार पांडे

Spread the love

घरच्या घरी होणार तपासणी

कोरोनाबाधित रूग्णांवर प्रथम उपचार होणे आवश्यक आहेत. ‘एंटिजन टेस्ट’द्वारे तासाभरामध्ये रिपोर्ट प्राप्त होणार आहे. नागरीकांची टेस्ट घेण्यासाठी मनपाने १७ टास्क फोर्स तयार केले आहे. शहरातील विविध भागांमध्ये जाऊन टास्क फोर्सची टिम तपासणी करतील. बाधित रूग्ण आढळल्यास त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात येईल. ‘एंटिजन टेस्ट’मुळे नागरीकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होण्याची गरज पडणार नाही. घरच्या घरी राहूनच त्यांना चाचणी करता येणार आहे. : आस्तिककुमार पाण्डेय (मनपा प्रशासक तथा आयुक्त)


कोरोनाबाधित रूग्णांची जलदगतीने माहिती मिळावी यासाठी आता ‘एंटिजन टेस्ट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० ते १८ जुलै दरम्यान पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या परिसरातील नागरीकांची या पध्दतीद्वारे चाचणी घेण्यात येईल. याशिवाय शहरात येणाऱ्यांनाही ही चाचणी करूनच प्रवेश देण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे़ रूग्ण आढळल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (संस्थात्मक विलगीकरण) करून लाळेचे नमुने (स्वॅब) घेण्यात येतात. नमुने घेतल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत २४ तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. तोपर्यंत रूग्णांवर उपचार करण्यास विलंब होतो. यावर पर्याय म्हणून ‘एंटिजन टेस्ट’चा पर्याय समोर आला आहे. त्याचाच वापर करून कोरोनाबाधितांना शोधण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. १० ते १८ जुलै दरम्यान होणाऱ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ‘एंटिजन टेस्ट’ करण्यात येणार असून यासाठी १७ टास्क फोर्स सज्ज करण्यात आले आहे. शहरात जिथे जिथे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येईल, तेथील ५०० मिटरच्या अंतरावरील नागरीकांची ‘एंटिजन टेस्ट’ करण्यात येईल. अवघ्या तासामध्ये टेस्टचा रिपोर्ट प्राप्त होणार असल्याने बाधित रूग्णांवर वेळीच उपचार होणार आहे.

प्रवाशांचीही होणार तपासणी

शहरामध्ये दररोज ७०० ते ८०० नागरीक अन्य जिल्ह्यातून येतात. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरीकांद्वारे कोरोना शिरकाव होण्याची शक्यता आहे. हा प्रकार घडू नये यासाठी प्रवाशांचीही ‘एंटिजन टेस्ट’ करण्यात येईल. रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतरच त्यांना शहरात प्रवेश देण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर अशा व्यक्तीस तत्काळ हॉस्पीटलमध्ये उपचारादासाठी दाखल करण्यात येईल. यासाठी शहराच्या सिमेवरती चार टिम सज्ज नियुक्त करण्यात आल्या आहेत.

आयुक्तांच्या दालनात झाली ट्रायल

लॉकडाऊनच्या काळामध्ये होणाऱ्या ‘एटीजन टेस्ट’ ची ट्रायल मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या दालनात बुधवारी ( दि.८) करण्यात आली. यात चार कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर टेस्ट करण्यात आली. आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!