Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : सेनेच्या आणखी एका नगरसेवकाचा मृत्यू , औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7300 वर

Spread the love

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनामुळे शिवसेनेचे नेते नितीन साळवी यांचे काल निधन झाल्यानंतर आज आज पहाटे ४ वाजता उपचारादरम्यान  आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रावसाहेब आमले असे त्यांचे नाव असून ते शहरातील पडेगाव परिसरातील नगरसेवक होते.  रावसाहेब आमले यांच्यावर आज प्लाझमा थेरपी होणार होती. मात्र, थेरपी करण्याआधीच त्यांचा मृत्यू ओढावला.

या नगरसेवकांना आदरांजली अर्पण करताना  माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले कि , ‘आमचे दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक हे सक्रीय होते. कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी गरजू लोकांसाठी मदतीचे कार्य केले होते. धूत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.आज सकाळी 10 वाजता त्यांना  प्लाझमा थेरपी देण्याचे ठरले होते. यासाठी दोन प्लाझमा दान करणारे व्यक्तीही समोर आले होते. पण, त्या आधीच आम्हाला दुख:द बातमी मिळाली. या दोघांच्याही निधनामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, 166 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 1003 स्वॅबपैकी आज 166 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण : (99)
हर्सुल जटवाडा रोड (1), मिल कॉर्नर (1), एन अकरा, हडको (5), सिडको (1), अमृतसाई प्लाजा (21), भगतसिंग नगर (1), एन सहा सिडको (1), एन बारा, हडको, टीव्ही सेंटर (1), एकनाथ नगर (1), शहागंज (1), शिवाजी नगर (2), कटकट गेट (1), वसंत विहार (1), हुसेन कॉलनी (1), मारोती नगर (2), देवळाई (1), सातारागाव (1), चिकलठाणा (2), नंदनवन कॉलनी (1), राजेसंभाजी नगर (3), स्वराज नगर (1), उस्मानपुरा (1), जवाहर कॉलनी (1), पिसादेवी (1), समर्थ नगर (1), एन सात, आयोध्या नगर (1), हर्सुल (1), खोकडपुरा (3), पैठण गेट (1), शिवशंकर कॉलनी (4), पवन नगर (1), जाफर गेट (1), पद्मपुरा (14), दशमेश नगर (1), गजानन नगर (2), रमा नगर (1), सुरेवाडी (1), जालान नगर (3), ज्योती नगर (1), छावणी (2), राम नगर (1), फुले चौक, औरंगपुरा (1), एसटी कॉलनी (1), जाधववाडी (3), टीव्ही सेंटर (2)
ग्रामीण भागातील रूग्ण : (67)
दत्त नगर, रांजणगाव (2), रांजणगाव (2), कराडी मोहल्ला, पैठण (1), वरूड काझी (1), सारोळा, कन्नड (1), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), अजिंठा (20), वडगाव कोल्हाटी (1), सिडको बजाज नगर (1), वडगाव साईनगर, बजाज नगर (1), छत्रपती नगर, वडगाव (2), वडगाव, बजाज नगर (1), विश्व विजय सो., बजाज नगर (1), एकदंत सो., बजाज नगर (1), आनंद जनसागर, बजाज नगर (1), वळदगाव (1), सुवास्तू सो., बजाज नगर (1), सासवडे मेडिकल जवळ, बजाज नगर (6), तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाज नगर (4), साराकिर्ती, बजाज नगर (2), गणपती मंदिरासमोर, बजाज नगर (2), पाटोदा, बजाज नगर (2), वडगाव कोल्हाटी, संगम नगर, बजाज नगर (2), अन्य (1), बालाजी सो., बजाज नगर (4), लक्ष्मी नगर, पैठण (4), शिवशक्ती कॉलनी, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!