MaharashtraNewsUpdate : चर्चेतली बातमी : राज्यपाल , राज्य , केंद्र आणि यूजीसीच्या वादात विद्यार्थ्यांचे भरीत….

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द केल्यामुळे राज्यपाल, युजीसी आणि केंद्र सरकार यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. यूजीसीने  सेमीस्टर आणि अंतिम परीक्षा घेण्यास  मान्यता दिली आहे त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न राज्य सरकारसमोर उपस्थित झाला आहे. यूजीसीच्या या निर्णयामुळे राज्य सरकाराला धक्का बसला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने एक नियमावली  जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, सप्टेंबर महिन्यापूर्वी परीक्षा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तर कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ऑफलाइन आणि ऑनलाइन पदव्युत्तर परीक्षा  होणार आहे.

Advertisements

दरम्यान युजीसीने नियमावली जाहीर केल्यामुळे देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेणे आता बंधनकारक ठरणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारने राज्यात वाढत चालेली कोरोनाची परिस्थिती पाहता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. यामध्ये राज्य सरकारने  व्यवसायिक (Professional) आणि गैर-व्यवसायिक (Non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.

Advertisements
Advertisements

या विषयावरून राजकारण होत असून, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता. एवढंच नाहीतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही राज्य सरकारच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांनी याबद्दल परीक्षा घेण्याबद्दल पत्रही लिहिले होते. त्यानंतर शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांशी चर्चा करून निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.   त्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घेणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

आपलं सरकार